शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

‘विवेक’च्या शिक्षणासाठी सरसावले मदतीचे अनेक हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 13:39 IST

आई-वडील नसलेल्या कौलव (ता. राधानगरी) येथील विवेक विजय हुजरे याला उच्च शिक्षणासाठी मदत करणारे अनेक हात शुक्रवारी सरसावले आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विवेक याचे शैक्षणिक प्रवेश शुल्क भरण्यासाठी दानशूर संस्था, व्यक्तींनी आर्थिक मदत जाहीर केली.

ठळक मुद्दे‘लोकमत’च्या आवाहनानंतर आर्थिक मदतीचा ओघदानशूर संस्था, व्यक्तींचा पुढाकार

कोल्हापूर : आई-वडील नसलेल्या कौलव (ता. राधानगरी) येथील विवेक विजय हुजरे याला उच्च शिक्षणासाठी मदत करणारे अनेक हात शुक्रवारी सरसावले आहेत. ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत विवेक याचे शैक्षणिक प्रवेश शुल्क भरण्यासाठी दानशूर संस्था, व्यक्तींनी आर्थिक मदत जाहीर केली.प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत बारावी आणि सीईटीमध्ये चांगल्या गुणांची कमाई करीत विवेक उत्तीर्ण झाला आहे. बी. टेक. एन्व्हायर्न्मेंटल अभ्यासक्रम पूर्ण करून जिल्हाधिकारी होण्याचे त्याचे ध्येय आहे. हा अभ्यासक्रम चार वर्षांचा आहे. दरवर्षीचे शैक्षणिक शुल्क ६० हजार रुपये आहे. पहिल्या वर्षासाठी प्रवेश घेण्याकरिता त्याच्याकडे पैसे नाहीत. त्याला आर्थिक मदतीची गरज असल्याचे वृत्त ‘लोकमत’च्या अंकात शुक्रवारी प्रसिद्ध झाले.

‘आई-वडील नसलेल्या विवेकला उच्च शिक्षणासाठी हवे बळ’ हे वृत्त विविध व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर दिवसभर फिरले. त्यावर विविध दानशूर संस्था, व्यक्तींनी विवेकला शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्याची तयारी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयासह शिरोली, इचलकरंजी, पेठवडगाव, आदी परिसरांतील ‘लोकमत’च्या वार्ताहर आणि विवेक यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून दाखविली. त्यामध्ये कोल्हापूर शहरातील वुई केअर ग्रुपने भरघोस मदत देणार असल्याचे सांगितले.

ट्रेंडी व्हीलचे मालक उद्योजक उदय लोखंडे यांनी १० हजार, शिरोली ग्रामपंचायतीचे सदस्य व उद्योजक अविनाश कोळी यांनी पाच हजार, ‘स्मॅक’चे अध्यक्ष राजू पाटील यांनी पाच हजार, उपाध्यक्ष अतुल पाटील यांनी तीन हजार, उद्योजक आणि ‘रोटरी’चे गव्हर्नर संग्राम पाटील यांनी पाच हजार रुपयांची, तर दुनियादारी इचलकरंजी आणि डीएमके टेक्स्टाईल डिप्लोमा या ग्रुपने १५ हजारांची मदत जाहीर केली आहे.

शिवाजी विद्यापीठातील कर्मचारी आनंद खामकर यांनी दोन हजार रुपये, तर सिद्धेश घुणकीकर यांनी एक हजार रुपये विवेक याच्या बँक खात्यावर जमा केले. या दानशूर संस्था, व्यक्तींच्या मदतीने त्याच्या पहिल्या वर्षाच्या शुल्काची पूर्तता होईल. मात्र, त्याला पुढील तीन वर्षांच्या प्रवेश शुल्कासाठी आणखी मदतीची गरज आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर