शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

काळम्मावाडी कालव्यांच्या गळतीने शेतीचे नुकसान

By admin | Updated: April 28, 2015 00:34 IST

लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : कालव्यातील दगड, झाडे, झुडपे काढली नसल्याने कालवा फुटीचे प्रकार

निवास पाटील - सोळांकूर -काळम्मावाडी प्रकल्पाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतील सततची गळती व कालवे फुटीच्या प्रकारांमुळे कालव्यालगतच्या शेकडो एकर जमिनी नापीक होण्याच्या मार्गावर आहेत, तर उत्पादन घटल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे. याकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या व डाव्या कालव्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. कालव्यांची अजूनही कामे अपूर्ण असताना केवळ राजकीय प्रेमापोटी पाणी सोडण्यात आले. सन १९९९ पासून दोन्ही कालव्यातून प्राथमिक अवस्थेत १०० ते ३०० क्युसेस दाबाने पाणी सोडले होते. सध्या सुमारे ८०० ते ९०० क्युसेस दाबाने पाणी सोडले जात आहे. एक ते आठ कि. मी.पर्यंत कालवा फुटीचे प्रकार घडत आहेत. तर काही ठिकाणी केवळ दगड रचून, सिमेंट, वाळूचा मुलामा दिला आहे. याचबरोबर काही ठिकाणी कालव्यातील मुरुमाचा भराव काढण्यात आला आहे. काही लोक स्वार्थापोटी कालव्याला भगदाड पाडत आहेत, तर काही ठिकाणी कालव्यातील दगड, झाडे, झुडपे काढली नसल्याने कालवा फुटीचे प्रकार घडत आहेत.कालव्यातील पाणी सोडण्याचे निश्चित वेळापत्रक नाही. जिओसिंथेटिक अस्तरीकरणाचा प्रायोगिक तत्त्वावरील प्रयत्न सफल न झाल्याने कालव्यांना सततची गळती आहे. परिणामी कालव्यालगतच्या शेतामध्ये सतत दलदल झाली आहे. दलदल झाल्याने उत्पादनात घट झाली आहे. काही ठिकाणी खारफुटी बाधीत शेती झाली आहे. त्याठिकाणी कोणत्याही प्रकारचे पीक येत नसल्याने शेतकरी हबकला आहे. गळतीमुळे काही गावांतील घरांमध्ये उमाळे फुटले आहेत. गळतीबाबत मात्र ठोस असा निर्णय अजून तरी अंमलात आला नाही. काही ठिकाणी आरसीसी भिंती उभ्या करण्यात आल्या आहेत. यांचाही फारसा फरक नसल्याने अत्याधुनिक यंत्रणा अंमलात आणून ही गळती थांबवावी, अशी मागणी होत आहे.कालव्याच्या देखभालीसाठी लाखो रुपये खर्च होतात, याचा योग्य उपयोग आवश्यक.विचित्र भू-स्तरादरम्यान लोखंड अथवा सिमेंट पाईपचा वापर व्हावा. पाणी सोडण्याचे निश्चित वेळापत्रक आवश्यक.गळतीचे पाणी निचरा होण्यासाठी छोटे पाट करून ते पाणी ओढे-नाल्या'द्वारे नदीपात्रात सोडावेत.खारफुटी शेतीचा नुकसानभरपाईबाबत विचार व्हावा.