शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

भगवान बाहुबलींच्या मूर्तीवर १७ला पहिला मस्तकाभिषेक श्रवणबेळगोळला सोहळा : चारशेंवर मुनी, माताजींचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:34 IST

सांगली : कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाला ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.

सांगली : कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाला७ फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. भगवान बाहुबली यांच्या मूर्तीवर पहिला मस्तकाभिषेक १७ फेब्रुवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी ३० आचार्यांसह ४०० हून अधिक जैन मुनी, माताजींचे आगमन झाले आहे.मस्तकाभिषेक महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव तथा सांगलीचे माजी महापौर सुरेश पाटील यांनी बुधवारी सोहळ्याच्या तयारीची माहिती दिली. ते म्हणाले की, आचार्य वर्धमानसागर महाराज यांच्या पावन सान्निध्यात व स्वस्तिश्री जगद््गुरू चारुकीर्ती भट्टारक महास्वामीजी यांच्या नेतृत्वाखाली बाहुबली मस्तकाभिषेकाची तयारी पूर्ण झाली आहे. ७ फेब्रुवारीला भगवान आदिनाथ मंदिराच्या पंचकल्याण महोत्सवाने सोहळ्याला सुरुवात होईल. १६ फेब्रुवारीपर्यंत पंचकल्याण महोत्सव चालणार आहे. त्यानंतर पहिला मस्तकाभिषेक १७ ला होणार आहे.

या सोहळ्यासाठी ३० आचार्यांसोबत ४०० हून अधिक पिंच्छिधारी मुनी व त्यागीगण सहभागी झाले आहेत. श्रवणबेळगोळ येथे आचार्य वर्धमानसागर महाराज, चंद्रप्रभूसागर, पंचकल्याणसागर, देवनंदी महाराज, पद्मनंदी महाराज व त्यांचे २० त्यागी, विशुद्धसागर महाराज व त्यांच्यासमवेत ३५ त्यागी, पुष्पदंत सागर महाराज यांच्यासमवेत १ त्यागी, याशिवाय जिनसेन महाराज, सच्छिदानंद महाराज, वासूपुज्य देवसेन महाराज, अमितसागर महाराज, आदर्शसागर महाराज, प्रसन्नश्रुषीजी महाराज, मुनीश्री चिन्मयसागर (जंगलवाले बाबा), गणिनी आर्यिका जिनमती माताजी, क्षमाश्री माताजी, विभाश्री माताजी यांचे आगमन झाले आहे.दररोज चार लाख भाविकांच्या भोजनाची व्यवस्था केली आहे.

भोजन व्यवस्थेची जबाबदारी कोलकाता येथील जैन समाजाने स्वीकारली आहे. संपूर्ण देशभरातून साखर, गहू, ज्वारी, तांदूळ, डाळ, मसाले, केसर, काजू, चहा, कॉपी, फळे, भाजीपाला व इतर भोजन सामग्री दान स्वरूपात येत आहे. सांगली, बेळगाव, चिक्कोडी, अथणी, जमखंडी या परिसरातून ५०० टनांहून अधिक साहित्य पाठविण्यात आले आहे. महोत्सव समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सरिता जैन (चेन्नई), कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र कुमार (बंगलोर), सचिव सतीश जैन (दिल्ली), राकेश सेठी (कोलकाता) आदी, सोहळा पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.सांगली, कोल्हापूरकरांसाठी २३ला अभिषेकसांगली, कोल्हापूर, बेळगाव जिल्ह्यांतील जैन श्रावक-श्राविकांसाठी २३ फेब्रुवारीला भगवान बाहुबलींच्या मूर्तीवर अभिषेक करण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अभिषेकसाठी कलश नोंदणीचे काम सुरू आहे. तरी या तीन जिल्ह्यांतील भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पाटील यांनी केले आहे.