शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हे प्रभू, जगाला कोरोनामुक्त कर : ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 17:34 IST

Christmas Kolhapur- हे प्रभू, जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांचे आरोग्य चांगले ठेव, अशी प्रार्थना (उपासना) कोल्हापुरात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी साधेपणाने नाताळ सण साजरा केला.

ठळक मुद्देहे प्रभू, जगाला कोरोनामुक्त कर : ख्रिस्ती बांधवांची प्रार्थना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने नाताळ साजरा

कोल्हापूर : हे प्रभू, जगाला कोरोनामुक्त कर, सर्वांचे आरोग्य चांगले ठेव, अशी प्रार्थना (उपासना) कोल्हापुरात शुक्रवारी ख्रिस्ती बांधवांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी साधेपणाने नाताळ सण साजरा केला. त्यांनी प्रभू येशूंच्या जन्मदिनानिमित्त वायल्डर मेमोरिअलसह अन्य चर्चमध्ये सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत विविध सत्रांमध्ये प्रार्थना केली. लहान मुले, वृद्धांनी घरातूनच प्रार्थना करीत नाताळचे स्वागत केले. नवीन कपडे परिधान करून प्रार्थनेसाठी चर्चमध्ये आलेल्या ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.शहरातील वायल्डर मेमोरिअल चर्च, ख्राईस्ट चर्च, सेंट फ्रान्सिस झेव्हिअर्स चर्च, होली इव्हॅँजलिस्टस चर्च, ऑल सेंट्स चर्च, विक्रमनगर ख्रिस्ती समाज ख्रिश्चन चर्च, होली क्रॉस, सेवंथ डे, आदींसह जिल्ह्यातील विविध चर्चमध्ये विशेष प्रार्थनांचे आयोजन केले होते.

थर्मल गनने तपासून मास्क असल्याचे पाहून भाविकांना चर्चमध्ये प्रवेश देण्यात आला. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी एका बेंचवर अंतर ठेवून दोघांची बैठक व्यवस्था केली होती. दरवर्षी प्रार्थनेचे तीन टप्पे होतात. यावेळी सहा ते सात टप्पे करण्यात आले.

हे प्रभू, देशाची एकता, अखंडता कायम राहो व जगात शांतता नांदो. जगावरील कोरोनाचे संकट लवकर दूर व्हावे, अशी प्रार्थना ख्रिस्ती बांधवांनी केली. न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरिअल चर्चमध्ये रेव्हरंड डी. बी. समुद्रे, जे. ए. हिरवे, अशोक गायकवाड, सिनोय काळे यांनी नाताळचा संदेश दिला.

या ठिकाणी आमदार चंद्रकांत जाधव, नगरसेवक रत्नेश शिरोळकर यांनी भेट देऊन उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी चर्च कमिटीचे आनंद म्हाळुंगेकर, संजय थोरात, विनय चोपडे, अतुल रुकडीकर, संदीप थोरात, सचिन समुद्रे, आदी उपस्थित होते. नाताळनिमित्त पुढील आठवडाभर विविध कार्यक्रम होणार आहेत.वृध्द, लहान मुलांसाठी ऑनलाईन व्यवस्थाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन करून चर्चमध्ये नाताळचे स्वागत करण्यात आले. सॅनिटायझर, थर्मल गन, आदींची व्यवस्था चर्चच्या प्रशासनाने केली. ६५ वर्षांवरील वृध्द आणि लहान मुलांना चर्चमध्ये प्रवेश दिला नाही. त्यांच्यासाठी ऑनलाईन प्रार्थनेची व्यवस्था केली होती, असे वायल्डर मेमोरियल चर्चच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आनंद म्हाळुंगेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Christmasनाताळkolhapurकोल्हापूर