शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोठडी भरण्यासाठी वाट कशाची बघताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:25 IST

कोल्हापूर : कोठड्या भरण्यासाठी तुम्ही वाट कशाची पाहताय..? भरा ना. आमची काही हरकत नाही. उलट तुरुंगातून जाऊन आल्यावर पुढची निवडणूक सोपी जाते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. मंत्री पाटील यांनी जनतेतून निवडणूक लढवावी म्हणजे त्यांना शिकायला मिळेल, ...

कोल्हापूर : कोठड्या भरण्यासाठी तुम्ही वाट कशाची पाहताय..? भरा ना. आमची काही हरकत नाही. उलट तुरुंगातून जाऊन आल्यावर पुढची निवडणूक सोपी जाते, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे महसूलमंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. मंत्री पाटील यांनी जनतेतून निवडणूक लढवावी म्हणजे त्यांना शिकायला मिळेल, असाही टोमणाही त्यांनी मारला.हल्लाबोल करून सरकारवर खोटे आरोप करीत असाल तर याद राखा. छगन भुजबळ यांच्या शेजारच्या दोन कोठड्या अजून शिल्लक आहेत,असा इशारा मंत्री पाटील यांनी भाजपच्या स्थापना दिनानिमित्त ६ एप्रिलला मुंबईत झालेल्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसला दिला होता. त्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांवर पवार यांनी वरील प्रत्युत्तर दिले.यावेळी आमदार हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी खासदार निवेदिता माने, माजी आमदार के. पी. पाटील, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, शहराध्यक्ष राजू लाटकर, राजेंद्र यड्रावकर, बाबूराव हजारे, अनिल साळोखे, अनिल कदम, अनिल घाटगे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.आम्ही एकत्र राहू की नाही याची लोकांना काळजीदेशात गेल्या वर्षभरात झालेल्या १० निवडणुकांपैकी आठ ठिकाणी भाजपचा पराभव झाला. जनता सत्ता बदल करण्यासाठी उत्सुक आहे; परंतु आम्ही एकत्र राहू की नाही, याचीच लोकांना काळजी वाटत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्यामुळेच आम्ही ज्या राज्यात ज्या पक्षाचा प्रभाव आहे, त्याच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवून लोकांना विश्वास द्यायचा व भाजपला सत्तेबाहेर घालविण्याचा प्रयत्न आहे.के. पी. शेजारीच बसा...के. पी. पाटील व ए. वाय. पाटील यांच्यामध्ये राधानगरी विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून संघर्ष सुरू आहे. पत्रकार परिषदेला पवार आल्यानंतर के. पी. हे डाव्या बाजूच्या समोरील खुर्चीवर बसत होते; परंतु ए. वाय. पाटील यांनी त्यांना बोलावून घेतले व मुश्रीफ यांच्या शेजारी बसा, असे सुचविले. ते पाहून पवार यांनी के. पी. त्यांच्या (म्हणजे ए. वाय.) शेजारीच बसा, असे म्हणताच जोरदार हशा पिकला.