शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

‘मिक्सिंग पॉर्इंट’वर जाणकारांची नजर

By admin | Updated: August 7, 2014 00:24 IST

पोलीस निरीक्षक नवीन : डॉल्बीमुक्त गणेशोत्सवासाठी पोलिसांनी कसली कंबर

एकनाथ पाटील-  कोल्हापूर   .. यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये प्रशासनातील पोलीस अधीक्षकांपासूनचे सगळेच अधिकारी नवीन आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी या संवेदनशील मिरवणुकीची जबाबदारी जाणकार आणि मुरब्बी कॉन्स्टेबलांवर पडणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान होणाऱ्या गर्दी व मारामारीच्या पार्श्वभूमीवर उमा टॉकीज, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, महालक्ष्मी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, आदी ‘मिक्सिंग पॉर्इंट’ची पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा येत्या दोन दिवसांत पाहणी करणार आहेत. गणेशोत्सव अवघ्या वीस दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदाही डॉल्बीमुक्त व दारू मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस दलाने उशिरा का होईना कंबर कसली आहे. परंतु यावर्षी पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांच्यासह अप्पर पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक व शहरातील जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी या चार पोलीस ठाण्यांचे प्रमुख नवीनच रूजू झाले आहेत. त्यामुळे शहरातील गुंडप्रवृत्तीच्या व्यक्ती व तरुण मंडळांचे कार्यकर्ते अद्याप नजरेखाली नाहीत. कोण-कोणत्या तालीम व मंडळामध्ये पूर्ववैमनस्य आहे, याचीही बऱ्यापैकी कल्पना नाही. त्यामुळे यंदाची सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीची संपूर्ण जबाबदारी जाणकार आणि मुरब्बी पोलीस कॉन्स्टेबलवर येऊन ठेपली आहे. नुकत्याच झालेल्या गणराया अवॉर्डमध्ये गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी ‘मिक्सिंग पॉर्इंट’वर कार्यकर्त्यांचे चेहरे ओळखणाऱ्या पोलिसांची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्याने जाणकार पोलिसांवर मोठी जबाबदारी येऊन ठेपली आहे. चारही पोलीस ठाण्यांतील अशा जाणकार पोलिसांची यादी बनविण्यात शहर पोलीस उपअधीक्षक भारतकुमार राणे मग्न आहेत.सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान एकाचवेळी अनेक गणेश मंडळे एकत्र आल्यानंतर ‘मिक्सिंग पॉर्इंट’ला पोलिसांची तारांबळ उडते. काही मंडळांचे कार्यकर्ते मुख्य मिरवणुकीत आपल्या मनाप्रमाणे प्रवेश मिळविण्याकरिता बंदोबस्तास असणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांशी वाद घालतात. त्यामुळे मिरवणूक खोळंबून राहण्याचे प्रकार यापूर्वी अनेकवेळा घडले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘मिक्सिंग पॉर्इंट’बाबत विशेष खबरदारी म्हणून डॉ. शर्मा येत्या दोन दिवसांत मिरवणूक मार्गांची पाहणी करणार आहेत. --लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी या परिसरातील गणेश मंडळे मुख्य मार्गाकडे किंवा पर्यायी मार्गाकडे वळतात. उमा टॉकीजकडून आलेली गणेश मंडळे तसेच कोळेकर तिकटीमार्गे आलेली शहरातील व करवीर तालुक्यातून आलेली गणेश मंडळे मिरवणुकीत सामील होऊन पुढे बिनखांबी गणेश मंदिराकडे जातात.--या ठिकाणी अधिकाऱ्यांनी उमा टॉकीजकडून येणारी दहा गणेश मंडळे बिनखांबी गणेश मंदिराकडे सोडल्यानंतर कोळेकर तिकटीकडून येणारी पाच मंडळे मिरवणुकीत सामील करून घेतली जातात. अशावेळी मंडळांची गर्दी होऊन पोलिसांवर ताण पडतो. बिनखांबी गणेश मंदिराकडे येणाऱ्या काही मंडळांचे मिक्सिंग खरी कॉर्नर येथे होते.गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाचे काटेकोरपणे नियोजन सुरू आहे. ‘मिक्सिंग पॉर्इंट’बाबत विशेष खबरदारी घेतली जाणार आहे. - डॉ. मनोजकुमार शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक