शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
3
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
4
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
5
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
6
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
7
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
8
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
9
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
10
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
11
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
12
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
13
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
14
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
15
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
16
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
17
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
18
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
19
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
20
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?

कॅमेरा ट्रॅपिंगद्वारे प्राण्यांच्या हालचालींवर नजर

By admin | Updated: March 5, 2015 00:44 IST

वन्यजीव विभागाचा उपक्रम : राधानगरी, सागरेश्वर व सह्णाद्री व्याघ्र प्रकल्प संरक्षक क्षेत्रात

कोल्हापूर : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासह राधानगरी, सागरेश्वर अभयारण्यांतील पट्टेरी वाघ, बिबट्या, गवे, जंगली कुत्रा, हरीण, अस्वल, टस्कर हत्ती, काळा चित्ता अशा एक ना अनेक प्राण्यांच्या हालचाली टिपण्यासाठी कोल्हापूर वन्यजीव विभागातर्फे ४० कॅमेरा ट्रॅप्स, एक स्पीड बोट, एक लाँच खरेदी केली जाणार आहे. विशेष म्हणजे कॅमेऱ्यांद्वारे प्राण्यांच्या हालचालींसह चोरट्या शिकारीवरही अंकुश ठेवला जाणार आहे. कोल्हापूर वन्यजीव अंतर्गत चांदोली राष्ट्रीय उद्यान, कोयना अभयारण्य, राधानगरी अभयारण्य, सागरेश्वर अभयारण्य ही जंगले येतात. या जंगलांत विविध प्रकारचे वन्यजीव आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी केंद्र शासन व राज्य शासन स्तरांवर विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या अंतर्गत उन्हाळा व हिवाळा या दोन ऋतूंमध्ये कॉरिडॉरमध्ये असलेल्या प्राण्यांच्या हालचाली व एकूण संख्या मोजली जाते. यापूर्वी त्या प्राण्याच्या पायांच्या ठशांद्वारे मोजणी केली जात होती. मात्र, यात सुधारणा होऊन कॅमेरे ट्रॅप्स आले आहेत. यातही रिमोटद्वारे हे कॅमेरे आॅपरेट केले जातात. ही गणना भारतीय वन्यजीव संस्था (डेहराडून) व राष्ट्रीय व्याघ्र प्रकल्प संवर्धन (दिल्ली) या ठिकाणी पाठविली जाते. याकरिता अत्याधुनिक प्रकारचे कॅमेरे उपयोगात आणले जातात. सध्या या प्रकल्पांमध्ये असलेले कॅमेरे कमी आहेत. त्यानुसार नव्याने चाळीस कॅमेरे खरेदी केले जाणार आहेत. याचबरोबर या प्रकल्पांमध्ये मनोरे, कुटी आणि स्पीड बोट, लाँचचीही खरेदी केली जाणार आहे. (प्रतिनिधी) या कॅमेऱ्याद्वारे मृत झालेला वन्यप्राणी कुठून आला हे समजते. त्याचबरोबर चोरटी शिकार करणाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी उपयोगी आहे. कॅमेऱ्याद्वारे अचूक इस्टिमेशन होणार आहे. वाघ, चित्ते, बिबट्या, आदी प्राण्यांची संख्या अचूक मिळणार आहे. यापूर्वी लावलेले कॅमेरे कमी असल्याने नव्याने निधी उपलब्ध झाल्यानंतर ४० नवीन कॅमेरे घेतले जाणार आहेत.- सीताराम झुरे, विभागीय वन अधिकारी. असा आहे हा कॅमेरा २४ मीटर इतक्या लांबून वन्यजिवांच्या हालचाली या कॅमेऱ्याद्वारे टिपल्या जातात. हे कॅमेरे रिमोटद्वारे वनसंरक्षक किंवा कर्मचारी लांबूनही आॅपरेट करू शकतात. याचबरोबर चोरटी शिकार, शेतकऱ्यांना उपद्रव देणारे प्राणीही शोधता येतात. या कॅमेऱ्याचा टाटा इन्स्टिट्यूट आॅफ फंडामेंटल रिसर्च अँड नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस (बंंगलोर) यांनी प्रथम तेथील जंगलात वापर केला. वेगवेगळ्या आकारांत या कॅमेऱ्याची हालचाल होते.