शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

‘कोजिमाशि’साठी दुरंगी लढत

By admin | Updated: April 8, 2015 00:58 IST

स्वाभिमानी सहकार आघाडी -

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांची सहकारी पतसंस्थेत (कोजिमाशि) सत्तारूढ स्वाभिमानी सहकार आघाडी व शाहू परिवर्तन महाआघाडीत सामना रंगणार आहे. २१ जागांसाठी ५२ उमेदवार रिंगणात राहिले असून, अटीतटीची दुरंगी लढत पाहावयास मिळणार आहे. मतदान १९ एप्रिलला होत असून, २० एप्रिलला मतमोजणी आहे. ‘कोजिमाशि’साठी २३५ अर्ज दाखल झाले होते. मंगळवारी अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने माघारीसाठी झुंबड उडाली होती. २३५ तब्बल १८३ जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे २१ जागांसाठी ५२ जण रिंगणात राहिले आहेत. सत्तारूढ स्वाभिमानी आघाडीच्या विरोधात सर्व विरोधक एकवटले होते पण जागावाटपाचा तिढा शेवटपर्यंत ताणला होता. एका जागेसाठी सकाळी अकरापर्यंत महाआघाडीच्या नेत्यांच्या बैठका सुरू होत्या अखेर दुपारी दोन वाजता तिढा सुटून ‘महाआघाडी’ची घोषणा करण्यात आली. महाआघाडीमध्ये विद्यमान संचालक संजय पाटील व माजी संचालक राजेंद्र रानमाळे व शहाजी पाटील यांना संधी देण्यात आली आहे. उर्वरित नवीन चेहऱ्यांना संधी देऊन त्यांनी समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तारूढ आघाडीने नवीन चेहरे देऊन तगडे पॅनेल देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वाभिमानी सहकार आघाडी -सर्वसाधारण गट - आनंदराव काटकर, गौतम पाटील, लक्ष्मण डेळेकर, धोंडिराम बाबर, रावसाहेब कारंडे, संजय जाधव, समीर घोरपडे, सुभाष पाटील, कृष्णात खाडे, संदीप पाटील, कृष्णात पाटील, रामचंद्र हालके, संजय डवर, शांताराम तौंदकर, हिंदुराव पाटील, सदाशिव देसाई. महिला - संगीता मांगलेकर, अंजली जाधव.अनूसुचित जाती - अनिल चव्हाणइतर मागासवर्गीय - कैलास सुतारभटक्या विमुक्त - गंगाराम हजारेराजर्षी शाहू परिवर्तन महाआघाडी -सर्वसाधारण गट - राजेंद्र रानमाळे, राजाराम बरगे, सुरेश खोत, अविनाश चौगुले, शामराव पाटील, शिवाजी खराडे, अरविंद किल्लेदार, शहाजी पाटील, बबन इंदूलकर, रवींद्र देसाई, सुरेश कोळी, संजय पाटील, महादेव पाटील, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, राजगोंडा झुणके.महिला - पुष्पलता चोपडे, सुलोचना कोळीअनूसुचित जाती - अशोक पलंगेभटक्या विमुक्त - बाळकृष्ण गिरीबुवाइतर मागासवर्गीय - प्रधान पाटील.