शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

लोकमत शॉपिंग उत्सव ‘हाऊसफुल्ल’

By admin | Updated: January 9, 2016 00:42 IST

कोल्हापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद : खरेदीसह हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी; उत्सवाचे शेवटचे दोन दिवस

कोल्हापूर : फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स, होम डेकॉरपासून रोजच्या वापरातील वस्तूंची खरेदी आणि लज्जतदार पदार्थांचा आस्वाद घेण्याची संधी एकाच छताखाली उपलब्ध झालेल्या ‘लोकमत शॉपिंग उत्सव २०१६’ला शुक्रवारी कोल्हापूरकरांनी ‘हाऊसफुल्ल’ गर्दी केली. मनसोक्त खरेदीसह मनपसंत, लज्जतदार पदार्थांचा आस्वाद आबालवृद्धांनी घेतला. खरेदीसह हजारोंची बक्षिसे जिंकण्याची संधी देणाऱ्या या उत्सवाचे आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत.नववर्षात नवनवीन वस्तू व सेवा खरेदीकडे ग्राहकांचा कल असतो, हे लक्षात घेऊन विविध वस्तू एकाच ठिकाणी खरेदी करता याव्यात, या उद्देशाने हा शॉपिंग उत्सव आयोजित केला आहे. या उत्सवाचे प्रायोजक ‘वॉव ज्वेल कलेक्शन’ तर, सहप्रायोजक ‘स्लीपवेल’ आहेत. कोल्हापुरातील परिपूर्ण कुटुंबासाठीचा सर्वांत मोठा खरेदी उत्सव असलेला ‘लोकमत शॉपिंग उत्सवा’ला शुक्रवारी दिवसभर गर्दी झाली. उत्सवातील फोर व्हिलर, इलेक्ट्रॉनिक्स, किचन अ‍ॅप्लायन्सेस, फर्निचर, होम अ‍ॅप्लायन्सेस, होम डेकॉर, पर्सनल केअर, फॅशन्स, हेल्थ केअर संबंधित वस्तू व त्यांच्या सेवांच्या माहितीचे स्टॉलवर प्रत्येक उत्पादनाचे वेगळेपण जाणून घेत अनेकजण कुटुंबासह नोंदणी करत होते. विविध प्रकारची लोणची, चटणी, बिस्किटे, दागिने आणि रोजच्या वापरातील वस्तूंच्या स्टॉलवर महिलांची अधिक गर्दी होती. सायंकाळनंतर गर्दीचा ओघ वाढला. उत्सवाची वेळ संपली तरी अनेकजण येत होते. खरेदीनंतर अख्खा मसूर, स्वीट कॉर्नभेळ, रोटी, ढोकळा, कच्छी दाबेली, अशा लज्जतदार पदार्थांचा उत्सवाला भेट देणाऱ्या अबालवृद्धांनी आस्वाद घेतला. (प्रतिनिधी)‘लकी ड्रॉ’तील विजेतेशॉपिंग उत्सवाला भेट देणाऱ्यांसाठी ‘लोकमत’ने लकी ड्रॉ आयोजित केला आहे. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी काढण्यात आलेल्या ड्रॉमध्ये ‘चिपडे सराफ’तर्फे देण्यात येणाऱ्या सोन्याच्या नथीचे मानकरी श्रीहरी कुलकर्णी ठरले. मेसर्स श्री गणेश एंटरप्रायझेसतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘वॉटर प्युरिफायर’च्या विजेत्या विजयमाला पाटील आणि स्लीपवेलच्या बेडशीटच्या विजेत्या अनिता शिंदे ठरल्या. ‘द नीड’च्या आकर्षक भेटवस्तूचे विजेते अमित महाडिक, तर स्वप्निल केंद्रे, तौसिफ जांभेकर, वर्षा भंडारी, के. बी. चौगुले, रूपाली पाटील, आदित्य कोठावळे हे अन्य बक्षिसांचे मानकरी ठरले.जाऊबाई जोरात,चित्रकला स्पर्धा आजउत्सवांतर्गत डॉ. व्ही. टी. पाटील स्मृतिभवनात ‘लोकमत’ सखी मंच आणि बालविकास मंचतर्फे विविध स्पर्धा घेण्यात येणार आहेत. यात बालविकास मंचतर्फे आज, शनिवारी (दि. ९) दुपारी साडेचार वाजता ‘माझे आवडते कार्टून’ विषयावर चित्रकला स्पर्धा होणार आहे. सखी मंचतर्फेसायंकाळी साडेपाच वाजता जाऊबाई जोरात स्पर्धा होईल.सुंदर साडी, उखाणे स्पर्धा रंगलीउत्सवांतर्गत ‘लोकमत’ सखी मंचतर्फे शुक्रवारी सायंकाळी सुंदर साडी आणि उखाणे स्पर्धा घेण्यात आली. यासाठी महिलांनी गर्दी केली होती. यातील सुंदर साडी स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी अस्सल कोल्हापुरी, राजस्थानी, दाक्षिणात्य, कशिदा केलेल्या, रेश्मी आदी प्रकारांतील सुंदर साड्या सादर केल्या. शिवाय साडींबाबतच्या आठवणी सांगितल्या. यात स्मिता वडगावकर (प्रथम), कविता पाटील (द्वितीय), राजेश्वरी मोटे (तृतीय), कोमल साखळकर (उत्तेजनार्थ) विजेत्या ठरल्या. शुभलक्ष्मी देसाई, अंजली ढोकर, स्नेहा सारडा, वैजयंती कुलकर्णी, जयश्री अडसुळे, विजयमाला पाटील यांना विशेष बक्षिसे देण्यात आली. या स्पर्धेचे द्वारकादास शामकुमार हे प्रायोजक आहेत. उखाणे स्पर्धेत स्पर्धकांनी विनोदात्मक, सामाजिक, प्रबोधनपर उखाणे सादर केले. यात अंजली ढोकर (प्रथम), अलका जोशी (द्वितीय), विमल चौगले (तृतीय), आशा जगताप, नीता मंडेद (उत्तेजनार्थ) विजेत्या ठरल्या. बबिता पंडत, ज्योती कुमठेकर, कविता पाटील, वनिता बक्षी, आस्मा सय्यद, उज्ज्वला चौगले यांना विशेष बक्षिसे देण्यात आली.