शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

‘लोकमत’चा दणका : राज्यभरातील रेशनवरील धान्य पूर्ववत वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 16:48 IST

सर्व्हर डाऊनमुळे राज्यातील ५२ हजार ३८३ रेशन दुकानांमधील पॉस मशीन बंद असल्याने रेशनवरील धान्य विक्री गेल्या चार दिवसांपासून बंद होती. याबाबत शनिवारी ‘ राज्यभरातील रेशनवरील धान्य विक्री ठप्प’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झाले. यामुळे खडबडून जागे झालेल्या पुरवठा विभागाकडून हालचाली होऊन पॉस मशिन शनिवारपासून पुर्ववत सुरु झाली. सर्व्हरची थोडी गती कमी असली तरी दोन दिवसात ते वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्दे‘लोकमत’चा दणका : राज्यभरातील रेशनवरील धान्य पूर्ववत वितरणसर्व्हरची गती थोडी कमी असली तरी पॉस मशिन सुरु

कोल्हापूर : सर्व्हर डाऊनमुळे राज्यातील ५२ हजार ३८३ रेशन दुकानांमधील पॉस मशीन बंद असल्याने रेशनवरील धान्य विक्री गेल्या चार दिवसांपासून बंद होती. याबाबत शनिवारी ‘ राज्यभरातील रेशनवरील धान्य विक्री ठप्प’ या आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द झाले. यामुळे खडबडून जागे झालेल्या पुरवठा विभागाकडून हालचाली होऊन पॉस मशिन शनिवारपासून पुर्ववत सुरु झाली. सर्व्हरची थोडी गती कमी असली तरी दोन दिवसात ते वाढण्याची शक्यता आहे.पॉस मशिन बंद असल्याने गेल्या चार दिवसांपासून ग्राहकांना रेशनवर गहू, तांदूळ, डाळ मिळालेली नाही. त्यामुळे ग्राहकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. धान्य मिळत नसल्याने गैरसमजातून ग्राहक व रेशन दुकानदार यांच्यामध्ये वादावादीचे प्रकारही घडले. त्यामुळे दुकानदारसंघटनांच्या प्रतिनिधींनी थेट राज्याच्या पुरवठा विभागाशी संपर्क साधला, परंतु तेथूनही प्रतिसाद मिळाला नाही.

परंतु ‘लोकमत’मधील वृत्तानंतर खडबडून जागे झालेल्या पुरवठा विभागाने हालचाली गतीमान करुन ही मशिन सुरु केली. राज्यातील सर्वच ठिकाणी शनिवारपासून पॉस मशिन सुरु होऊन रेशनवर धान्य पुरवठा पुर्ववत सुरु झाल्याने ग्राहकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. असे असली तरी काही ठिकाणी सर्व्हरची गती अजूनही धिमी आहे. येत्या दोन दिवसात ती ही वाढून पुर्ववत होईल, असे सुत्राकडून सांगण्यात आले.

सर्व्हर डाऊनमुळे राज्यभरातील पॉस मशीन बंद असल्याने रेशनवरील धान्य विक्री पूर्णपणे बंद होती. याबाबत पुरवठा विभागाशी संपर्क साधूनही त्यांनी याकडे कानाडोळा केला. परंतु ‘लोकमत’मधून राज्यस्तरीय वृत्त प्रसिध्द झाल्याने खडबडून जागे झालेल्या पुरवठा विभागाने ही मशिन सुरु केली आहेत. त्यामुळे शनिवारपासून राज्यातील पॉस मशिन सुरु होऊन रेशन दुकानांमधून धान्य वितरण सुरु झाले आहे.-चंद्रकांत यादव, राज्य प्रवक्ते, रेशन बचाव समिती

 

 

टॅग्स :Governmentसरकारkolhapurकोल्हापूर