शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामविकासातील शिलेदारांना ‘लोकमत’चे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:13 IST

कोल्हापूर : ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देणाºया कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा सरपंचांना बुधवारी शानदार समारंभामध्ये ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आले. येथील व्ही. टी. पाटील स्मृतिभवनामध्ये तब्बल तीन तास चाललेला हा समारंभ म्हणजे ग्रामविकासावरील एक प्रकारचे विचारमंथनच ठरले.गावागावांतील विकासकामांची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाºयांना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्ड २०१७’ने गौरविण्याचा निर्णय ...

कोल्हापूर : ग्रामविकासामध्ये भरीव योगदान देणाºया कोल्हापूर जिल्ह्यातील तेरा सरपंचांना बुधवारी शानदार समारंभामध्ये ‘लोकमत सरपंच अवॉर्डस्’ने सन्मानित करण्यात आले. येथील व्ही. टी. पाटील स्मृतिभवनामध्ये तब्बल तीन तास चाललेला हा समारंभ म्हणजे ग्रामविकासावरील एक प्रकारचे विचारमंथनच ठरले.गावागावांतील विकासकामांची नोंद घेण्यासाठी गावच्या कारभाºयांना ‘बीकेटी टायर्स प्रस्तुत लोकमत सरपंच अवॉर्ड २०१७’ने गौरविण्याचा निर्णय ‘लोकमत’ने घेतला. ‘पतंजली आयुर्वेद’ हे या उपक्रमाचे प्रायोजक, तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक होते.काँग्रेसचे नेते व माजी ग्रामविकास राज्यमंत्री, आमदार सतेज पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, निवड समितीमधील प्रमुख जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, संपादक वसंत भोसले यांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.पहिल्याच वर्षी पुरस्कारासाठी केलेल्या आवाहनाला कोल्हापूर जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. सुमारे २५० हून अधिक सरपंचांनी आपले प्रस्ताव सादर केले. प्रारंभी दीपप्रज्वलन करून ‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. त्यानंतर विशाल पाटील नृत्य अकादमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या शेतकरी नृत्याला उपस्थितांनी जोरदार दाद दिली.यावेळी बीकेटी टायर्सचे असिस्टंट मॅनेजर महाराष्ट्र सेल्स जुबेर शेख, एरिया मॅनेजर (टेक्निकल सर्व्हिस अ‍ॅन्ड सपोर्ट) नेत्रानंद अंबाडेकर, महिंद्रा अ‍ॅन्ड महिंद्राचे पुणे एरिया मॅनेजर सत्यव्रत देशपांडे, चॅनेल केअर मॅनेजर आनंद दुलारिया, टेरिटरी मॅनेजर नितीशकुमार गावंदर, लकी आॅटो कोल्हापूरच्या वसुंधरा राजेंद्र बडे, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव, आजºयाचे माजी सरपंच जनार्दन टोपले, आरेचे माजी सरपंच शिवाजीराव पाटील यांचीही प्रमुख उपस्थिती होती. समीर देशपांडे व प्रिया दंडगे यांनी सूत्रसंचालन केले.दरम्यान, ‘रात्री झोपताना दिव्याची वात विझवून झोपा. तेलाच्या आशेने उंदीर येऊन ही वात पळवेल आणि माझ्या शेतकºयाच्या गवताच्या गंजीला आग लागू शकेल. तेव्हा ही दक्षता घ्या,’ ही शिकवण देणाºया शिवाजी महाराजांचा इतिहास वाचा; म्हणजे नेतृत्व कसे करायचे हे कळेल, असे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.