शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

लोकमत महामॅरेथॉन नोंदणी दणकेबाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 00:37 IST

कोल्हापूर : ‘आरोग्यासाठी धावा’ हा मंत्र घेऊन राज्यभरात गेल्या तीन वर्षांपासून ‘लोकमत’ने महामॅरेथॉनची मुहूर्तमेढ रोवली. त्यानुसार गत फेब्रुवारीमध्ये कोल्हापुरात ...

कोल्हापूर : ‘आरोग्यासाठी धावा’ हा मंत्र घेऊन राज्यभरात गेल्या तीन वर्षांपासून ‘लोकमत’ने महामॅरेथॉनची मुहूर्तमेढ रोवली. त्यानुसार गत फेब्रुवारीमध्ये कोल्हापुरात महामॅरेथॉनचा नवा अध्याय सुरू झाला. त्याला कोल्हापूरकरांसह उत्तर कर्नाटक, गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, आदी ठिकाणांहून धावपटूंसह हौशी नागरिकांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महामॅरेथॉनच्या दुसऱ्या पर्वाची सुरुवात ६ जानेवारी २०१९ ला होत आहे. ही ‘व्हिंटोजिनो’ प्रस्तुत ‘लोकमत महामॅरेथॉन’ पॉवर्ड बाय आॅक्सिरिच स्पर्धा अवघ्या १५ दिवसांवर येऊन ठेपली आहे. धावपटूंसह सर्वांना या प्रत्यक्ष स्पर्धेचे वेध लागले आहेत. जशी स्पर्धा जवळ येईल तसा आबालवृद्धांकडून प्रतिसाद वाढू लागला आहे. वाढता उत्साह व नावनोंदणीसाठी वाढता कल बघून ‘लोकमत’ने यापूर्वीच सहा दिवस नोंदणीकरिता वाढविले आहेत. या वाढीव मुदतीचेही आता केवळ तीन दिवस उरले आहेत. त्यामुळे ज्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही, त्या सर्वांनी त्वरित नोंदणी करावी.पहिल्या पर्वाच्या दणकेबाज सुरुवातीनंतर यंदा दुसºया पर्वाविषयीही धावपटूंसह राज्यासह परराज्यांतील धावपटूंना मोठी उत्सुकता आहे. या स्पर्धेत राज्यभरातून स्पर्धक सहभागी झाले आहेत. २१ किलोमीटर, १० किलोमीटर आणि पाच तसेच तीन किलोमीटरसाठी कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अत्यंत विक्रमी असा प्रतिसाद नोंदवून कोल्हापूरकरांनी ‘लोकमत महामॅरेथॉन’वर विश्वासाची मोहोरच उमटविली आहे.प्रत्यक्ष स्पर्धेला अजूनही १५ दिवस बाकी असले तरी कोल्हापूर शहर, जिल्ह्यातील मॅरेथॉनपटू, आयर्नमॅन, हौशी धावपटू, मास्टर्स अ‍ॅथलिट आणि सर्वसामान्य कोल्हापूरकर आपल्यासह कुटुंबाचाही सहभाग नोंदणी करीत आहेत. विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी, संघटना, सामाजिक संघटना, क्रीडा संघटना, विविध प्रकारचे क्रीडा क्लब व उद्योगसमूहही आपल्या कर्मचाºयांसह महामॅरेथॉनमध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे आबालवृद्ध या महामॅरेथॉनच्या दुसºया पर्वात धावताना दिसणार आहेत. सहभागी होणाºया धावपटूंना ‘लोकमत’तर्फे धावमार्गावर विविध मनोरंजन आणि बरेच काही दिले जाणार आहे. नोंदणीसाठी केवळ तीनच दिवस उरले आहेत. आता नाही तर कधीच नाही; म्हणून त्वरा करा...शहराचा नकाशा असणारेमिळणार ‘मेडल’या मॅरेथॉनमधील १० आणि २१ किलोमीटरची स्पर्धा पूर्ण करणाºया प्रत्येक धावपटूला कोल्हापूरचा नकाशा असलेली मेडल्स देण्यात येणार आहेत. नाशिक आणि औरंगाबाद येथे झालेल्या मॅरेथॉनमधील धावपटूंना त्या-त्या शहराचा नकाशा असणारी मेडल्स दिली आहेत.धावपटूने औरंगाबाद, नाशिक, कोल्हापूर आणि पुणे, नागपूरमधील मॅरेथॉन पूर्ण करून मिळविलेली मेडल्स जुळविल्यास आपल्या ‘महाराष्ट्रा’चा नकाशा बनणार आहे. या पाच शहरांमधील मॅरेथॉन जिंकून हे मेडल पटकाविणारा धावपटू हा ‘महामॅरेथॉनर’ ठरणार आहे.मॅरेथॉन म्हणजे सणवर्षातून एकदा येणारी ‘लोकमत महामॅरेथॉन’ म्हणजे आमच्यासारख्या प्रौढ धावपटूंकरिता जणू सणच असतो. त्यामुळे मी तर सहभागी होणार आहे. तुम्हीही यात सहभागी व्हावे, असे मत ज्येष्ठ धावपटू धोंडिराम चोपडे यांनी रविवारी व्यक्त केले. वर्षातून एकदा होणाºया महामॅरेथॉनमध्ये धावल्यानंतर त्यातील सहभागी धावपटू पाहून माझ्यासारख्या धावपटूला वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा मिळते. त्यामुळे ही स्पर्धा जणू सणासारखीच असते. विशेषत: जे भाग घेणार आहेत ते पोलीस मुख्यालय मैदानावर हजेरी लावणारच आहेत. मात्र, जे भाग घेणार नाहीत, त्यांनीही आरोग्य काय असते ते पाहण्यासाठी तरी यावे.काऊंटडाऊन सुरू‘लोकमत महामॅरेथॉन’च्या दुसºया पर्वासाठी धुमधडाक्यात नोंदणी सुरू झाली आहे. कोल्हापुरात गेल्या वर्षी ‘लोकमत महामॅरेथॉन’ला उदंड प्रतिसाद लाभला. महामॅरेथॉन फन रन (१२ वर्षांपेक्षा जास्त धावण्याचा छंद असणाºयांसाठी), १० किलोमीटरची पॉवर रन (१६ पेक्षा जास्त वर्षांवरील) आणि २१ किलोमीटर (१८ पेक्षा जास्त) असणार आहे. त्यात फॅमिली रन तीन किलोमीटर अंतराची असणार आहे. ती सर्वच वयोगटांसाठी खुली असणार आहे.त्याचप्रमाणे लष्कर, पोलीस दलातील धावपटूंसाठी वेगळा गट ठेवला आहे. विदेशातील स्पर्धकांनाही या महामॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची अंतिम मुदत गुरुवार (दि. २०)पर्यंत होती. मात्र, वाढता सहभाग लक्षात घेऊन लोकाग्रहास्तव सहभाग नोंदणीसाठी आणखी सहा दिवसांची वाढ केली आहे. आता २६ डिसेंबर २०१८ ही नोंदणीसाठी अंतिम तारीख असणार आहे.तुम्ही फीट तर सर्व ठीक$: शाहू मानेमैदानी खेळातच शारीरिक व्यायाम लागतो असे नाही; तर बौद्धिक खेळातही शारीरिक व्यायाम लागतो; कारण मन तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण स्वत: फिट राहणे गरजेचे आहे. मी जरी नेमबाजी करीत असलो तरी मनाची एकाग्रता राखण्यासाठी मन, शरीर तंदुरुस्त राहावे लागते. त्यामुळे मीही धावण्याचा सराव करतो.त्यामुळे तुम्हीही ‘लोकमत’च्या महामॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये धावणे गरजेचे आहे, असे मत युवा आॅलिम्पिक रौप्यपदक विजेता आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू माने याने व्यक्त केले.मैदानी स्पर्धा खेळणाºयांना शरीराच्या हालचाली गतिमान करण्यासाठी धावणे ही गरजेची बाब मानली जाते. फुटबॉल, क्रिकेट, कबड्डी, खो-खो, हॉकी, बास्केटबॉल, हँडबॉल, व्हॉलिबॉल, कराटे, कुस्ती, आदी खेळांमध्ये शारीरिक तंदुरुस्तीला अधिक महत्त्व दिले जाते, असा सर्वांचा समज आहे. मात्र, बौद्धिक जसे बुद्धिबळ, नेमबाजी, मोटारकार रेस, आदींमध्ये चांगली कामगिरी व्हावी. मन आणि शरीर तंदुरुस्त राहावे, याकरिता शारीरिक कष्ट महत्त्वाचे आहेत. त्यामुळे धावण्यासारखा बिनपैशाचा व्यायाम नाही. त्यामुळे प्रत्येकाने धावणे गरजेचे आहे. आजकाल पैशांपेक्षा शारीरिक तंदुरुस्तीला अधिक महत्त्व आहे. शरीर तंदुरुस्त राहिले तर लाखो नव्हे, तर कोट्यवधी रुपये आपण कमवू शकतो. मात्र, तंदुरुस्तीअभावी आपल्या मनात कमकुवतपणा, निरुत्साह एकूणच देहबोलीवर दिसून येतो.धावण्यासारख्या स्पर्धांची यापूर्वी कोल्हापुरात कमतरता होती. मात्र, गेल्या वर्षीपासून ‘लोकमत’ने महामॅरेथॉनच्या रूपाने ही संधी कोल्हापूरच्या क्रीडाप्रेमींकरिता दिली आहे. त्यामुळे सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा.खेळ कोणताही असो; त्याकरिता स्वत: फिट राहणे गरजेचे आहे. त्यामुळे मीही जरी नेमबाजीच्या सरावासाठी पुणे, केरळ, बंगलोर येथे असलो तरी एक जानेवारीला कोल्हापुरात आहे. त्यामुळे या स्पर्धेत मी ६ जानेवारीला धावणार आहे. तुम्हीही मागे न राहता आजच सहभाग नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करा.