शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

लोकमत अंक विक्रेते सुभाष बारदेस्कर निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:18 IST

मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथील दिनेश न्यूजपेपर एजन्सीचे मालक, कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब ...

मुरगूड : मुरगूड (ता. कागल) येथील दिनेश न्यूजपेपर एजन्सीचे मालक, कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष, बाळासाहेब जमादार विकास सेवा सोसायटी मुरगूडचे माजी व्हाईस चेअरमन आणि माजी सैनिक संघटनेचे विभाग प्रमुख तसेच ‘लोकमत’चे अंक विक्रेते सुभाष बंडा बारदेस्कर (अण्णा) (वय ७०) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

त्यांनी भगतसिंग तरुण मंडळाचे क्रियाशील सभासद, इंदिरा महिला सहकारी ग्राहक संस्थेचे सभासद व सर पिराजीराव घाटगे नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी सभापती म्हणून ही कार्य केले होते. कडक शिस्त आणि रोखठोक स्वभाव यामुळे बारदेस्कर यांचा वेगळा ठसा मुरगूड शहर परिसरात होता.

गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी ‘लोकमत’सह अन्य दैनिकाचे वितरण केले आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शहरासह परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन अंत्यदर्शन घेतले. यावेळी नगराध्यक्ष राजेखान जमादार, पक्षप्रतोद संदीप कलकुटकी, नगरसेवक अमर सनगर, सुहास खराडे, इचलकरंजीचे माजी नगरसेवक रॉकी फर्नांडिस, बिद्री साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक किसन चौगुले, संतोष भोसले, सागर भोसले, देवराज बारदेस्कर, संजय भारमल, दत्तात्रय मंडलिक, मुरगूड शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल पाटील सचिव राजू चव्हाण यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. मुरगूड शहर पत्रकार फाउंडेशनच्या वतीने दिवंगत बारदेस्कर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवंगत बारदेस्कर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, मुलगी, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

चौकट

अण्णांना आगळीवेगळी श्रद्धांजली

पहाटे तीन वाजता ग्रामीण रुग्णालयात बारदेस्कर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पहाटे सहापर्यंत सोशल मीडिया व फोनवरून शहरात ही माहिती समजली त्यावेळी आजचा वर्तमानपत्राचा अंक मिळणार नाही, असे अनेकांनी गृहीत धरले होते. पण अंक वाटणाऱ्या मुलांनी अण्णांचे अंत्यदर्शन घेऊन घरोघरी अंक पोहोचवले. महापूर, वादळ वारा किंवा कौटुंबिक कसलीही अडचण आली तरी नेहमी अंक पोहोचवण्यामध्ये अण्णांची तत्परता असायची. यामधून त्यांची कामावरील निष्ठा दिसून येते. आज याच विचाराने अंक वाटून त्यांच्या सहकाऱ्यांनी वेगळीच श्रद्धांजली वाहिली.