शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष

By विश्वास पाटील | Updated: April 30, 2024 08:13 IST

कोल्हापूरच्या सामाजिक जीवनात  छत्रपती घराण्याबद्दल आस्था आहे. त्यामुळे महायुतीने ‘मान गादीला.. मत मोदींना’ अशा प्रचारावर भर दिला आहे .

विश्वास पाटील

कोल्हापूर : महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उमेदवार भलेही २३ रिंगणात असले, तरी शिंदेसेनेचे खासदार संजय मंडलिक व काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्यातच दुरंगी काटाजोड लढत होत आहे.

राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन

कोल्हापूरच्या सामाजिक जीवनात  छत्रपती घराण्याबद्दल आस्था आहे. त्यामुळे महायुतीने ‘मान गादीला.. मत मोदींना’ अशा प्रचारावर भर दिला आहे, तर महाविकास आघाडी ‘मान गादीला आणि मतही गादीला’च अशी मोहीम सुरू केली आहे. दोन्ही आघाड्यांचे नेते विजयासाठी झटत आहेत; परंतु विधानसभेला तुमचे बघू, आता लोकसभेला काय करायचे ते आमचं आम्ही ठरवू, अशी बंडखोर भूमिका घेऊन नेत्यांच्या हातातून सुटलेल्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवरच या मतदारसंघाचा गुलाल ठरणार आहे.

प्रचारात गाजत असलेले मुद्दे

      दलबदलूपणा कोल्हापूरच्या जनतेला कधीच आवडत नाही. गतवेळची निवडणूक त्याभोवतीच फिरली. यंदाही तो मुद्दा केंद्रस्थानी.

      खासदार संजय मंडलिक यांनी निवडून आल्यावर आपल्या मतदारसंघाकडे पाठ फिरवल्याच्या नागरिकांच्या तक्रारी.

      शाहू छत्रपती यांच्या दत्तकविधी-बद्दल उपस्थित केलेले मुद्दे, त्यांची डमी उमेदवार म्हणून संभावना.

नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

 महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, प्रकाश आबिटकर यांच्यावर मंडलिक यांच्या विजयाची जबाबदारी आहे. मंडलिक यांच्या निकालावर मुश्रीफ यांचे विधानसभेचे राजकारणही अवलंबून आहे. या नेत्यांनी अंतर्विरोध बाजूला ठेवून मंडलिक यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे.

 मविआत आमदार सतेज पाटील, पी. एन. पाटील, व्ही. बी. पाटील यांच्यासह उद्धवसेनेच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी निवडणूक अंगावर घेतली आहे.

कुणाकडे किती पाठबळ ?

      काँग्रेसकडून पहिल्याच यादीत शाहू छत्रपती यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांना सुरुवातीचा अवधी प्रचारासाठी मिळाला. याउलट मंडलिक यांना उमेदवारीसाठीही झगडावे लागले. आता दोघांनीही प्रचाराचे रान उठविले आहे.

      चुरशीची लढत असल्याने महायुतीने शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेऊन वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला. या मतदारसंघात काँग्रेसकडे पाच आमदारांचे बळ आहे. महायुतीकडे तीन आमदार आहेत.

निवडणुकीतील कळीचे मुद्दे

अनेक वर्षांत एकही मोठा नव्या प्रकारचा उद्योग आला नाही. फौंड्री, फोर्जिंग, टूल मेकिंगवरच गुजराण. इलेक्ट्रॉनिक्समधील उद्योगाची गरज.

पंचगंगा नदीच्या प्रदूषणाकडे सर्वच पक्षांकडून कमालीचे दुर्लक्ष. नुसते आराखडे करण्यातच अनेक वर्षे गेली. त्याचा पाठपुरावा नाही.

वाढते शहरीकरण; परंतु पायाभूत सुविधांची वानवा, कोल्हापूरची हद्दवाढ नको म्हणून प्राधिकरण केले; परंतु ते बांधकाम परवानगी देण्यापलीकडे काही करीत नाही.

साखर, गूळ, दुग्ध व्यवसाय हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा; परंतु त्याचा अभ्यास करणारी राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरील संशोधन संस्था आणण्याचे प्रयत्न नाहीत.

२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी ?

वर्ष     विजयी उमेदवार  पक्ष    टक्के

२०१४   धनंजय महाडिक राष्ट्रवादी ४८.१९%

२००९   सदाशिवराव मंडलिक     अपक्ष   ४१.६५%

२००४   सदाशिवराव मंडलिक     राष्ट्रवादी ४९.४२%

१९९९   सदाशिवराव मंडलिक     राष्ट्रवादी ४६.३३%

१९९८   सदाशिवराव मंडलिक     काँग्रेस  ५१.६६%

टॅग्स :kolhapur-pcकोल्हापूरSanjay Mandalikसंजय मंडलिकlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४