शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 शहरी मतदारांसाठी रस्सीखेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:01 IST

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत ‘कोल्हापूर’, ‘गडहिंग्लज’ या शहरांनी शिवसेनेचे संजय मंडलिक यांना, तर ‘कागल’ शहराने ...

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत ‘कोल्हापूर’, ‘गडहिंग्लज’ या शहरांनी शिवसेनेचे संजय मंडलिक यांना, तर ‘कागल’ शहराने राष्टÑवादीचे धनंजय महाडिक यांना ताकद दिली होती. विशेष म्हणजे मंडलिक यांना दोन्ही शहरांत ३२८३ इतकी मते मिळाली होती; पण महाडिक यांना एकट्या कागल शहराने २६५२ मते दिली होती. आता संदर्भ बदलले असून, दोघांनाही हे बळ कायम राखण्यासाठी कसरत करावी लागणार हे मात्र निश्चित आहे. कोल्हापूर मतदारसंघात कोल्हापूरसारख्या मोठ्या शहरासह गडहिंग्लज, कागल ही लहान शहरे येतात.गेल्या लोकसभा निवडणुकीत या तिन्ही शहरांत संजय मंडलिक यांना एक लाख ४० हजार ५९०, तर धनंजय महाडिक यांना एक लाख ३९ हजार ९५९ मते मिळाली होती. गेल्या पाच वर्षांत या तिन्ही ठिकाणची समीकरणे बदलली आहेत. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत ८१ पैकी ४४ जागा जिंकत दोन्ही कॉँग्रेसने सत्ता स्थापन केली. भाजप व ताराराणी आघाडीने ३३, तर ‘मनसे’ने एका जागेवर विजय संपादन केला. शहरात शिवसेना-भाजपच्या तोडीस तोड दोन्ही कॉँग्रेसची ताकद आहे; पण कॉँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ‘शिवधनुष्य’ हातात घेतल्याने येथे राष्टÑवादीला ‘ताराराणी’ आघाडीला सोबत घेऊन लढावे लागत आहे; त्यामुळे गेल्या वेळच्या मंडलिक यांच्या १३८५ च्या मताधिक्यात वाढ करण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी कंबर कसली आहे, तर मंडलिकांचे मताधिक्य कमी करण्यासाठी महाडिक यांनी जोडण्या लावल्या आहेत.कागल शहरात गेल्या वेळेला महाडिक यांना २६५२ चे मताधिक्य मिळाले होते; त्यावेळी हसन मुश्रीफ व समरजितसिंह घाटगे ताकदीने त्यांच्या मागे होते. आता समरजितसिंह घाटगे हे मंडलिक यांच्या बाजूने असल्याने हे मताधिक्य राखणे महाडिक यांच्यासमोर आव्हान आहे. गडहिंग्लज शहरात गेल्या वेळेला मंडलिकांना १८९८ इतके मताधिक्य मिळालेहोते. त्यावेळी जनता दलाचे अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे हे मंडलिक यांच्या बाजूने होते. गडहिंग्लज साखर कारखान्याच्या राजकारणामुळे या वेळेला येथील समीकरणे बदलली आहेत.एकंदरीत कोल्हापूर मतदारसंघात तिन्ही शहरांतील मतदारांची भूमिका महत्त्वाची असून, या मतदारांचा कौल मिळविण्यास दोन्ही उमेदवारामध्ये स्पर्धा लागली आहे.कोणत्या भागातकोणाचा आहे होल्ड?शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापूर शहरात शिवसेनेचे मताधिक्य राहिले होते. तर कागलमध्ये राष्टÑवादीने बाजी मारली होती.कोल्हापूर महापालिकेत कॉँग्रेस, राष्टÑवादी, तर कागलमध्ये राष्टÑवादीची सत्ता आहे. गडहिंग्लज जनता दलाच्या ताब्यात आहे.शहर संजय मंडलिक धनंजय महाडिककोल्हापूर १,२५,८९६ १,२४,५११गडहिंग्लज ७,३६३ ५,४६५कागल ७,३३१ ९,९८३एकूण १,४०,५९० १,३९,९५९

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक