शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 जनसंपर्क नसल्याने विरोधकांकडून आमिष दाखविण्याची वेळ-नीलम गोºहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 18:57 IST

शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा जनसंपर्क चांगला आहे. याउलट निवडून आल्यानंतर मतदारसंघात जनसंपर्क न ठेवल्याने विरोधी उमेदवारांवर मतदारांना आमिषे दाखवून प्रलोभित करण्याची वेळ आली आहे,

ठळक मुद्देसंजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शनिवार पेठ, बुधवार पेठेत पदयात्रा

कोल्हापूर : शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांचा जनसंपर्क चांगला आहे. याउलट निवडून आल्यानंतर मतदारसंघात जनसंपर्क न ठेवल्याने विरोधी उमेदवारांवर मतदारांना आमिषे दाखवून प्रलोभित करण्याची वेळ आली आहे, असा टोला शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी शुक्रवारी लगावला. विरोधकांच्या या आमिषांना जनता बळी न पडता प्रा. संजय मंडलिक यांनाच विजयी करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्तकेला.

शिवसेना-भाजप-रिपाइं-रासप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शनिवार पेठ, जुना बुधवार पेठ परिसरात आयोजित पदयात्रेप्रसंगी त्या बोलत होत्या. सकाळी प्रचारफेरीची सुरुवात शनिवार पेठ येथील शिवसेना शहर कार्यालय येथून आमदार डॉ. नीलमताई गोºहे, आमदार राजेश क्षीरसागर, देवस्थान समिती कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, शिवसेना शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली. यावेळी मंडलिक यांना मतदान करण्याचे आवाहन करत ही प्रचारफेरी पुढे काळाइमाम तालीम, बाजारगेट रोड, बजाप माजगावकर तालीम, जोशी गल्ली कॉर्नर, पिवळावाडा चौक, बुरुड गल्ली, मृत्युंजय तरुण मंडळ, निकम गल्ली, गिरणी कॉर्नर, शिपुगडे तालीम, डांगे गल्ली, तोरस्कर चौक, जुना बुधवार तालीम, भगतसिंग चौक, सोन्या मारुती चौकमार्गे शिवसेना शहर कार्यालय येथे येऊन समाप्त करण्यात आली.

आ. गोºहे म्हणाल्या, राजेश क्षीरसागर यांच्या रूपाने शनिवार पेठ, जुना बुधवार पेठ परिसरातून शिवसेना प्रमुखांना अभिप्रेत आमदार कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने निवडून दिला असून, या लोकसभेला संजय मंडलिक यांच्या रूपाने शिवसेनेचा खासदार निवडून द्यावा.आमदार क्षीरसागर म्हणाले, निवडणुकीस चार दिवसांचा अवधी शिल्लक असून, शिवसैनिकांनी गाफील न राहता, दक्ष राहावे.या प्रचारफेरीस माजी महापौर अ‍ॅड. महादेवराव आडगुळे, श्रीकांत बनछोडे, निशिकांत मेथे, धनंजय सावंत, शशिकांत पाटील, ऋतुराज क्षीरसागर, उदय भोसले, अनिल पाटील, अजित राडे, उमेश जाधव, ओंकार परमणे, सुनील करंबे, संतोष दिंडे, शिवसेना महिला आघाडी शहर संघटक मंगल साळोखे, पूजा भोर, शाहीन काझी, महानंदा रेळेकर, पूजा पाटील, पूजा कामते सहभागी होते.कोल्हापूर मतदारसंघाचे शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी शिवसेना प्रवक्त्या आ. डॉ. नीलम गोºहे व आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली शनिवार पेठ, बुधवार पेठ परिसरात पदयात्रा काढण्यात आली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर