शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 जागा मिळाली नाही तरी आघाडीसोबतच : राजू शेट्टी यांची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 01:18 IST

काँग्रेस आघाडीसोबतच जागावाटपाचा तिढा सुटला नाही तरी स्वबळावर लढूच; पण आघाडीला मदत करण्याची आणि युतीला विरोध करण्याची भूमिका आहे, असे खासदार

ठळक मुद्देयुतीला मदत होईल अशी भूमिका घेणार नाही

इचलकरंजी : काँग्रेस आघाडीसोबतच जागावाटपाचा तिढा सुटला नाही तरी स्वबळावर लढूच; पण आघाडीला मदत करण्याची आणि युतीला विरोध करण्याची भूमिका आहे, असे खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.

देशभरात फिरून शेतकरी हिताचे काम करणारे २१ पक्ष व संघटना एकत्रित आणून दिल्लीत आंदोलन केले व त्यातूनच भाजपविरोधात महाआघाडीचा जन्म झाला असे सांगून शेट्टी म्हणाले, ‘आम्ही राज्यात १५ जागा लढायची तयारी केली होती परंतू आघाडी धर्म पाळण्यासाठी तेरा जागा माघार घेतली. बुलडाण्यात येथे अर्ज भरताना रविकांत तूपकर हे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेंद्र शिंगणे यांच्यासोबत होते. त्यामुळे काँग्रेस आघाडीने दोन जागा ‘स्वाभिमानी’ला द्याव्यात, अशी आमची मागणी होती. आम्ही त्यांना बुलढाणा, वर्धा किंवा सांगलीची जागा सुचविली. नंतर शिर्डीचाही पर्याय दिला; परंतु कोणती जागा द्यायची हा तिढा अजून सुटलेला नाही. सांगलीची जागा आम्ही सुचवली होती; परंतु त्यामागे वसंतदादा घराण्यावर अन्याय करावा, अशी आमची कधीच भावना नव्हती. कोणती जागा द्यावी हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही अजूनही आशावादी आहोत.

खासदार शेट्टी यांनी मंगळवारी त्यांचे गतवेळचे प्रतिस्पर्धी, काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांची भेट घेतली. आवाडे यांनी आघाडीच्या निर्णयानुसार शेट्टी यांना ताकदीने सहकार्य करू असा शब्द दिला. त्यानंतर शेट्टी यांनी काँग्रेस भवनला भेट दिली. यावेळी शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश मोरे, प्रकाश सातपुते, राहुल आवाडे उपस्थित होते.

कोणतीही खळखळ न करता आणखी एक जागा द्या कोणत्याही प्रकारची खळखळ न करता सांगली किंवा शिर्डी येथील जागा ‘स्वाभिमानी’ला द्यावी, अशी अपेक्षा खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ते म्हणाले, महाआघाडी अस्तित्वात येण्यापूर्वी ‘स्वाभिमानी’ने राज्यात पंधरा जागा लढविण्याची तयारी केली होती; पण आघाडी धर्म पाळण्यासाठी आम्ही तेरा ठिकाणी माघार घेतली. अगदी बुलडाणा येथे उमेदवारी अर्ज भरताना रविकांत तूपकर हे कॉँग्रेसच्या राजेंद्र शिंगणे यांच्याबरोबर होते. आता शिर्डी किंवा सांगली येथील एक जागा आघाडी धर्म पाळण्यासाठी कॉँग्रेसने निर्विवादपणे ‘स्वाभिमानी’ला दिली पाहिजे.मुख्यमंत्र्यांना टोला युतीच्या कोल्हापुरातील प्रचारावेळी माझ्यावर चोराच्या आळंदीत सहभागी झाल्याची टीका झाली; पण त्या व्यासपीठावर शेतकऱ्यांना बुडविणारे कोण-कोण बसले होते, हे त्यांनी नीटपणे पाहावे. लुच्च्या लोकांतून मी लवकर बाहेर पडलो हेच बरे झाले, अशा लोकांना शॉक ट्रीटमेंट द्यायला हवी, असा टोला शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीBJPभाजपा