शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
4
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
5
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
7
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
8
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
9
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
10
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
11
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

Lok Sabha Election 2019 : महादेवराव महाडिक यांनी फोनवरून केली धनंजय यांची कानउघडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 16:15 IST

धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी विचारातच घेतले नसल्याची तक्रार ज्येष्ठ नेत्यांनी महादेवराव महाडिक यांच्या समोर मांडताच त्यांनी तात्काळ तेथूनच फोन करत त्यांची कानउघडणी केली. 

ठळक मुद्देमहादेवराव महाडिक यांनी फोनवरून केली धनंजय यांची कानउघडणी खुपीरे दौऱ्याच्यावेळी नाराज गटाची घेतली भेट

कोल्हापूर/ कोपार्डे : धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी विचारातच घेतले नसल्याची तक्रार ज्येष्ठ नेत्यांनी महादेवराव महाडिक यांच्या समोर मांडताच त्यांनी तात्काळ तेथूनच फोन करत त्यांची कानउघडणी केली. 

ज्येष्ठ नेत्यांनी धनंजय महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला विचारातच घेतले नसल्याची तक्रार महादेवराव महाडिक यांच्या समोर मांडली. तात्काळ तेथूनच धनंजय महाडिकांना फोन करत त्यांची कान उघडणी केली. 

खुपीरे ता.करवीर येथे धावत्या दौऱ्याच्यावेळी आज महादेव महाडिक बोलत होते. तुकाराम पाटील, सरदार बंगे, सर्जेराव पाटील या नाराज असलेल्या गटाची भेट घेऊन त्यांच्या बरोबर चर्चा करत साथ देण्याची हाक दिली.

यावेळी तुम्हाला राजकीय ताकदिचे कार्यकर्ते ओळखता येतात की नाही, ज्यांनी आम्हाला आज पर्यंत सर्वत्र मदत केली, त्यांचा अपमान खपवून घेणार नाही असे खडसावले. यानंतर झालेल्या चुका सुधारू हा महादेवराव महाडिकांचा शब्द आहे असे त्यांनी आपल्या स्टाईल मध्ये सगळ्यांची समजूत घातली.

धनंजय महाडिक यांच्या काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारण्याचे अभिवचन मी देतो. पण यावेळी धनंजय महाडिक यांना मदत करा अशी विनंती करत यावेळी पी. एन. पाटील यांना आमदार करणार असून गोकूळच्या सभेत नाचणाऱ्या आमदाराला विधानसभेच्या निवडणुकीत नाचवणार असे आ. चंद्रदिप नरके यांचे नाव न घेता धमकी दिली.यावेळी झालेल्या चर्चेत महादेव महाडिक म्हणाले, जर पी.एन.पाटील आमदार झाले नाहीत तर महादेव महाडिकांचे राजकरण संपणार आहे.

यासाठी आता पी.एन. पाटील यांना आमदार केल्याशिवाय गप्प बसणार नाही, जर असे झाले नाही तर गोकुळमधून आम्हाला हाकलायला हे मागे पुढे पहाणार नाहीत. हा महाडिक एखाद्याचे मागे लागला तर त्याला संपविल्याशिवाय राहत नाही, असा दमच आ. चंद्रदिप नरके, आ. सतेज पाटील यांचे नाव न घेता दिला.

यावेळी कुंभीचे माजी अध्यक्ष सर्जेराव पाटील माजी उपाध्यक्ष तुकाराम पाटील माजी सरपंच प्रकाश चौगले, सरदार बंगे,स.नि. पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.खुपीरे ता करवीर येथे धावत्या दौऱ्यादरम्यान बजरंग दूध संस्थेत झालेल्या बैठकीत बोलताना माजी आ.महादेवराव महाडिक शेजारी तुकाराम पाटील सर्जेराव पाटील स. नि. पाटील, सरदार बंगे प्रकाश चौगले व कार्यकर्ते

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूर