शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

Lok Sabha Election 2019 : आघाडी धर्म पाळावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे जिल्हाध्यक्षांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 11:01 IST

काँग्रेस व राष्ट्रवादीची राज्यात आघाडी झाली असल्याने पक्षनेते व कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळून आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात उतरावे, अशा आशयाचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना पाठविले आहे. या पत्राबरोबरच प्रचार समन्वयकांच्या नियुक्तीचे पत्र पाठविण्यात आले आहे.

ठळक मुद्दे आघाडी धर्म पाळावा, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे जिल्हाध्यक्षांना पत्र कोल्हापूर, हातकणंगलेसाठी प्रचार समन्वय नियुक्त

कोल्हापूर : काँग्रेस व राष्ट्रवादीची राज्यात आघाडी झाली असल्याने पक्षनेते व कार्यकर्त्यांनी आघाडी धर्म पाळून आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात उतरावे, अशा आशयाचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्षांना पाठविले आहे. या पत्राबरोबरच प्रचार समन्वयकांच्या नियुक्तीचे पत्र पाठविण्यात आले आहे.कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांसाठी आमदार संग्राम थोपटे यांची प्रचार समन्वयक म्हणून नियुक्ती झाली आहे. हे पत्र हातात पडल्यानंतर जिल्ह्यात काँग्रेस सक्रिय झाली असून, समन्वयकांच्या नेतृत्वाखाली येत्या सोमवारी (दि. २५) आघाडीची एकत्रित बैठक घेतली जाणार आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी सांगितले.गुरुवारी दुपारी आवाडे हे काँग्रेस कमिटीत आले होते. प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संपर्क साधला असता, आवाडे यांनी प्रदेशाध्यक्षांच्या सूचना व समन्वयक याची माहिती दिली. कोल्हापूर मतदारसंघात काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेचा प्रचार करीत असल्याची ‘प्रदेश’ने गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळेच प्रदेशाध्यक्षांनी पत्र पाठवून आघाडी धर्म पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात असल्याचेही आवाडे यांनी सांगितले.

राष्ट्रवादीकडून अधिकृत निरोपाची वाट पाहतोयप्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार प्रचारात सक्रिय होत असलो तरी अजूनही राष्ट्रवादीकडून अधिकृत निरोप आला नसल्याची कबुलीही आवाडे यांनी दिली. अधिकृत निरोपाची आम्ही सर्वजण वाट पाहत आहोत, अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली. राष्ट्रवादीला सोमवारच्या बैठकीचा निरोप देण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप प्रतिसाद आलेला नाही, असे आवाडे यांनी सांगितले.आठवडाभरात यंत्रणा गतिमान होणारसध्या प्रचारात शिथिलता दिसत असली तरी आठवडाभरात सर्व यंत्रणा गतिमान होणार आहेत. उमेदवारी अर्ज भरल्यानंतरच घडामोडी वाढणार आहेत. दोन्ही काँग्रेससह घटकपक्षांचे नेते सक्रिय होतील, अशा जोडण्या लावण्यात येत आहेत. नेत्यांतील वाद लवकर मिटावेत यासाठी मी स्वत: आग्रही आहे, असे आवाडे यांनी स्पष्ट केले.आमदार सतेज पाटील व आवाडे बैठककाँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्याविरोधात प्रचार करीत असल्याच्या मुद्द्यावरून सध्या राज्यभर पडसाद उमटत आहेत. हे लोण इतरत्र पसरू नये याची दक्षता काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आमदार पाटील यांच्याशी बोलून यातून मार्ग काढण्यासाठी स्वत: जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी पुढाकार घेतला आहे.

बुधवारी या संदर्भातच आवाडे व पाटील यांची बैठक झाली आहे. बैठकीतील तपशिलाबाबत दोन्हींकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे; तथापि पाटील यांची समजूत काढण्यात आवाडे यांना यश आल्याचे सांगण्यात येत आहे. सोमवारी समन्वयक आमदार थोपटे यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या आघाडीच्या एकत्रित बैठकीतच याबाबतची घोषणा होणार आहे. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूर