शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 गर्दी चांगली; परंतु विजयी आत्मविश्वासाचे काय..? : तब्बल १७ भाषणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 20:03 IST

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी बुधवारी रात्री गांधी मैदानावर झालेली प्रचारसभा जंगी झाली; परंतु त्या गर्दीला चेतवून त्यांच्यात विजयाचा आत्मविश्वास निर्माण करण्यात नेत्यांना अपयश आले. रात्रीची सभा असताना व लोक लवकर आलेले

ठळक मुद्देविरोधी उमेदवारांवर टीका करण्यात हात आखडताइतरांनी मोदी यांच्यावरच टीकेचा भडिमार केला. त्यातही अनेकांनी सोईची भूमिका घेतली.मोदी आणि पवार

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी बुधवारी रात्री गांधी मैदानावर झालेली प्रचारसभा जंगी झाली; परंतु त्या गर्दीला चेतवून त्यांच्यात विजयाचा आत्मविश्वास निर्माण करण्यात नेत्यांना अपयश आले. रात्रीची सभा असताना व लोक लवकर आलेले असताना त्याच-त्याच त्याच तब्बल १७ भाषणांची जंत्री सुरू राहिली. त्याचा परिणाम म्हणून शरद पवार बोलायला उभे राहिल्यावर मैदानातून लोक निघून गेले. विशेष म्हणजे विरोधी उमेदवारांवरही मोजक्याच नेत्यांनी टीका केली.राष्ट्रवादीचा अखेरचा टोला म्हणून या सभेकडे पाहिले गेले. मुळात या सभेला काँग्रेसचाही किमान राज्यस्तरीय एखादा नेता आणण्याचे प्रयत्न होते; परंतु ते घडले नाही; कारण काँग्रेसचे नेते आपापल्या मतदारसंघातच अडकून पडले आहेत. भाजप-शिवसेनेने त्यांच्या राज्यातील प्रचाराचा नारळ तपोवन मैदानावर विराट सभा घेऊन फोडला. त्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठीच या सभेचे आयोजन करण्यात आले.

माणसे सभेला खेचून आणण्यात पक्ष व स्वतंत्र महाडिक यांची यंत्रणा यशस्वी झाली. त्यामुळे मैदान चौफेर भरले होते. एवढ्या मोठ्या समुदायासमोर भाषणांचा क्रम हा कार्यकर्त्यांना चेतवणारा हवा होता; परंतु सगळ्यांना बोलण्याची संधी देण्याच्या नादात रटाळ भाषणे लांबली. पवार यांनीही जास्तीत जास्त तीनच भाषणे ठेवावीत, अशा सूचना केल्या होत्या; परंतु काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांना बोलायला दिले आणि पी. एन. पाटील यांना संधी दिली नाही तर त्यातून चुकीचा संदेश जातो अशी कोंडी पक्ष व उमेदवाराची झाली. त्यात काहींनी मी पवारसाहेब व्यासपीठावर आल्यावरच बोलणार, असाही आग्रह धरला. त्यामुळे एक-दोन नव्हे तर तब्बल १७ भाषणे झाली; परंतु ती रंगली नाहीत. स्वत: उमेदवार खासदार महाडिक हे भावनिक झाले. केलेल्या चांगल्या कामाची उतराई म्हणून पुन्हा एकदा संधी द्या, असे त्यांनी आवाहन केले.

पवार यांचे बुधवारचे भाषण ऐकल्यावर राष्ट्रवादीच्याच अनेक कार्यकर्त्यांना २००४ च्या त्यांच्या बिंदू चौकातील भाषणाची आठवण झाली. ‘राष्ट्रवादी’चे सदाशिवराव मंडलिक विरुद्ध शिवसेनेचे धनंजय महाडिक या निकराच्या लढतीत कोल्हापूरची सीट गेली, असे त्यावेळी वातावरण झाले होते. म्हणून पवार यांचा भीमटोला म्हणून बिंदू चौकात सभा झाली. त्या सभेत पवार यांनी याच महाडिक यांना ‘कौन है यह मुन्ना..?’ असा प्रश्न विचारल्यावर सभेत उपस्थित असलेल्या अनेकांच्या अंगावर शहारे उमटले होते. पवार यांचे ते भाषण कार्यकर्त्यांना एवढे चार्ज करून गेले की, लढतीचा निकालच बदलला. इतके आक्रमक बोलणे पवार यांना या वयात शक्य नाही; परंतु तरीही कार्यकर्त्यांना चार्ज करण्यासाठी जी ऊर्जा सभेतील भाषणांतून मिळायला हवी, ती फारशी मिळाली नाही. बहुतेक वक्त्यांनी विरोधी उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर फारसा राजकीय हल्ला केलाच नाही. महाडिक, जोगेंद्र कवाडे आणि ‘स्वाभिमानी’चे अजित पोवार व खोत यांनीच मंडलिक यांच्यावर टीका केली. इतरांनी मोदी यांच्यावरच टीकेचा भडिमार केला. त्यातही अनेकांनी सोईची भूमिका घेतली.मंडलिक हा शब्दच विसरले...हसन मुश्रीफ यांनी महाडिक यांच्यासाठी हाडाची काडं व रक्ताचे पाणी करण्याची ग्वाही कागल स्टाईलने दिली; परंतु गंमत अशी की, मुश्रीफ यांनी या पूर्ण निवडणुकीत मंडलिक या शब्दाचाही साधा कधी उल्लेख केलेला नाही; तिथे उमेदवारावर टीका करायचे लांबच...!मोदी आणि पवारमहाराष्ट्रात भाजपला पोषक हवा नसल्यानेच पंतप्रधानांसारख्या नेत्याला वारंवार या राज्यात यावे लागते, अशी टीका परवाच पवार यांनी पत्रकार परिषदेत केली होती. मग याच न्यायाने पवार हे वारंवार कोल्हापूरला तर आले नसतील का, अशीही विचारणा आता कार्यकर्त्यांतून होऊ लागली आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर