शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

Lok Sabha Election 2019 घर ते घर प्रचारावरच भर-जाहीर सभांना फाटा देण्याचीच पक्षांची मानसिकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 15:38 IST

टोकाच्या ईर्ष्येमुळे लोकसभा निवडणुकीला ग्रामपंचायत निवडणुकीसारखे स्वरूप आले आहे. एकेक मतदार महत्त्वाचा मानून गटांची फोडाफोडी सुरू झाल्याने पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते कमालीचे सावध झाले आहेत.

कोल्हापूर: टोकाच्या ईर्ष्येमुळे लोकसभा निवडणुकीला ग्रामपंचायत निवडणुकीसारखे स्वरूप आले आहे. एकेक मतदार महत्त्वाचा मानून गटांची फोडाफोडी सुरू झाल्याने पक्षाचे प्रमुख नेते, कार्यकर्ते कमालीचे सावध झाले आहेत. अशा परिस्थितीत सर्व यंत्रणा जाहीर सभांमध्ये गुंतवून ठेवणे धोक्याचे ठरत असल्याने ‘जाहीर सभा नको’ अशीच मानसिकता तयार होऊ लागली आहे. त्यातच मोठ्या सभांचा खर्च परवडण्याच्या पलीकडे गेल्याने याऐवजी घर ते घर प्रचारावर भर देण्याची नेत्यांची भूमिका दिसत आहे. 

जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत चारही उमेदवार तगडे असल्याने लढतीला काट्याच्या टकरीचे स्वरूप आले आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी असा पक्षीय सामना वरवर दिसत असला तरी या दोन्ही लढती व्यक्तिगत स्वरूपावर आल्या आहेत. कोल्हापूर मतदारसंघात सेना विरुद्ध राष्ट्रवादीऐवजी ‘मंडलिक विरुद्ध महाडिक’ असा संघर्ष पेटला आहे; तर हातकणंगले मतदारसंघात ‘शेतकरी विरुद्ध बहुजन’ असा संघर्ष पेटला आहे. व्यक्तिगत पातळीवर गेलेल्या या निवडणुकीत प्रश्नांची मांडणीही व्यक्तिगतच होत आहे. एकमेकांची उणीदुणी काढण्यावरच भर दिला असल्याने लोकसभेची निवडणूक असल्याचा विसर पडल्याचेच चित्र आहे.

अशा परिस्थितीत अधिकाधिक मतदारांना आपल्या गोटात ओढण्यासाठी गावपातळीवर जोरदार रस्सीखेच सुरू आहे. जाहीर सभांतून बडे नेते देशपातळीवरील प्रश्नांना हात घालत असले तरी सध्याच्या वातावरणात स्थानिक उखाळ्या-पाखाळ्यांंमध्ये हे प्रश्न विरून चालले आहेत. त्यामुळे सभा घेऊन मोठा खर्च करण्यापेक्षा घर ते घर भेटी देऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा पर्याय नेते, कार्यकर्त्यांनी जवळ केला आहे. गावनिहाय, वॉर्डनिहाय, मतदारसंघनिहाय मेळावे, पदयात्रा यांच्या माध्यमातून अधिकाधिक मतदारांना आपल्या जाळ्यात ओढले जात आहे. जाहीर सभा नकोचजाहीर सभा घ्यायची म्हटली तरी त्याची परवानगी, वाहनांची नोंदणी, बैठकीची व्यवस्था यामध्ये यंत्रणा गुंतून पडते. शिवाय गर्दी जमविण्यासाठी वेगळी यंत्रणा राबवावी लागते. मोठ्या सभांचा खर्च किमान दहा लाखांवर जातो. वेळ, श्रम व पैसा वाया जातो, त्या बदल्यात त्यातून फारसा लाभ होत नाही. याउलट गळ्यात पक्षाचे उपरणे घालून हात जोडत पदयात्रा, कोपरा सभा घेतलेल्या बऱ्या अशी मानसिकता दृढ होत आहे. शिवाय निवडणूक आयोगाच्या जाचासह श्रम, वेळ, पैसाही वाचत असल्याने याकडेच कल आहे.निवडणूक खर्चावरून संतापउमेदवारांना ७० लाखांपर्यंतच खर्च करता येतो. जाहीर सभा जास्त घेतल्यातर या रकमेत खर्च बसविणे शक्य होत नाही. त्यातच यावेळी निवडणूक खर्चावरून यंत्रणेने उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांना चांगलाच घाम फोडला आहे. निवडणूक आयोगाने लावलेला खर्च व उमेदवारांकडून दाखविलेला खर्च यांत तफावत आढळत असल्याने उमेदवारांना नोटिसा पाठवल्या जात आहेत. प्रचार करायचा की या नोटिसींना उत्तरे देत बसायची, असा संताप उमेदवारासह कार्यकर्तेही व्यक्त करू लागले आहेत. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapur-pcकोल्हापूर