शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुखांच्या स्वागताला गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 19:52 IST

भाजप-शिवसेना युतीच्या प्रचार प्रारंभानिमित्त कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला रविवारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली.

ठळक मुद्देमुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुखांच्या स्वागताला गर्दीविमानतळावर पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती

कोल्हापूर : भाजप-शिवसेना युतीच्या प्रचार प्रारंभानिमित्त कोल्हापुरात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला रविवारी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गर्दी केली.मुंबईहून दुपारी चारच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाअध्यक्ष रावसाहेब दानवे, वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार, आदी कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. त्यांचे स्वागत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

यावेळी भाजपचे जिल्हा संघटनमंत्री बाबा देसाई, जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, आदी उपस्थित होते. दरम्यान, दुपारी तीनच्या सुमारास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री अनंत गीते, सेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर, युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे,आदी विमानतळावर आले. त्यांचे स्वागत शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक, धैर्यशील माने यांनी केले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, युवासेनेचे हर्षल सुर्वे, आदी उपस्थित होते. विमानतळावरुन हॉटेल सयाजी येथे पहिल्यांदा शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे आले. त्यानंतर अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन याठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस आले. या दोन्ही नेत्यांना भेटण्यासाठी त्यांच्या पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी याठिकाणी गर्दी केली.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस