शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

Lok Sabha Election 2019 : राहूल आवाडेंचे बंड ठरले पेल्यातील वादळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:18 PM

कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे सूपूत्र व जिल्हा परिषदेचे सदस्य राहूल आवाडे यांचे हातकणंगले मतदारसंघातील बंड दोन दिवसात थंड झाले. गुरूवारी रात्री एक वाजता ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे व खासदार राजू शेट्टी यांची बैठक झाली. अनावधनाने राहूलने हा निर्णय घेतला, पण ‘हातकणंगले’ मध्ये शेट्टींनाच पाठींबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.

ठळक मुद्देराहूल आवाडेंचे बंड झाले थंडघरगुती अडचणीमुळेच आवाडे आले नाहीत

कोल्हापूर : कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचे सूपूत्र व जिल्हा परिषदेचे सदस्य राहूल आवाडे यांचे हातकणंगले मतदारसंघातील बंड दोन दिवसात  पेल्यातील वादळ ठरले. गुरूवारी रात्री एक वाजता ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे व खासदार राजू शेट्टी यांची बैठक झाली. अनावधनाने राहूलने हा निर्णय घेतला, पण ‘हातकणंगले’ मध्ये शेट्टींनाच पाठींबा असल्याचे त्यांनी जाहीर केले.‘स्वाभिमानी’ आघाडीचे हातकणंगलेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी आवाडे गटाला विश्वासात घेतले नसल्याच्या रागातून राहूल आवाडे यांनी या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची घोषणा केल्याने आघाडीत खळबळ उडाली होती. अहमदनगर, माढ्यातील बंडाचे लोन कोल्हापूरातही पोहचल्याने दोन्ही कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यात कमालीची अस्वस्थता होती.

गुरूवारी शेट्टी यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आवाडे कुटूंबातील एकही सदस्य उपस्थित नसल्याने आवाडेंच्या बंडाची चर्चा दिवसभर सुरू राहिली. या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी गुरूवारी रात्री कल्लाप्पाण्णा आवाडे, प्रकाश आवाडे व राहूल आवाडे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सविस्तर चर्चा होऊन अनावधनाने राहूल नी उमेदवारी अर्जाचा निर्णय घेतल्याचे सांगत आवाडे कुटूंबियांसह सारी कॉँग्रेस आपल्या सोबत राहिल, अशी ग्वाही आवाडे यांनी दिली. त्यामुळे राहूल आवाडेंचे बंड थंड झाले.घरगुती अडचणीमुळेच आवाडे आले नाहीतउमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेट्टी यांनी प्रकाश आवाडे यांना बोलावले होते. पण आवाडे यांच्या मातोश्री इंदूमती आवाडे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरू असल्याने आपण येऊ शकले नाहीत. असा खुलासा प्रकाश आवाडे यांनी केला. 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकhatkanangle-pcहातकणंगलेkolhapur-pcकोल्हापूर