शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो हायटेक प्रकल्पास ३२ कोटींचे कर्ज -‘एनसीडीसी’चा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 00:15 IST

कोल्हापूर : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील मेट्रो हायटेक को-आॅप. टेक्स्टाईल पार्कला राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) योजनेतून ३१ कोटी ९६ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. त्यासंबंधीचा आदेश सहकार,

ठळक मुद्देफॅब्रिक डार्इंग प्रोसेसिंग प्रकल्पास निधी

कोल्हापूर : कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील मेट्रो हायटेक को-आॅप. टेक्स्टाईल पार्कला राष्ट्रीय सहकारी विकास निगम (एनसीडीसी) योजनेतून ३१ कोटी ९६ लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाले आहे. त्यासंबंधीचा आदेश सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाने शनिवारी (दि. ३१ मार्च) काढला आहे. कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी स्थापन केलेल्या रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील हे या पार्कचे अध्यक्ष आहेत. पाटील यांचा संघटनेच्या उभारणीत कितपत उपयोग होतो, हा वादाचा मुद्दा असला तरी मेट्रो हायटेकला मात्र राज्यातील सत्तेचा चांगलाच उपयोग होत आहे.या संस्थेला राज्य शासनाकडूनही यापूर्वी कर्ज मंजूर झाले आहे. यंत्रमाग सहकारी संस्थांच्या विकासासाठी अर्थसाहाय्य करण्याच्या दृष्टिकोनातून ‘एनसीडीसी’ नवी दिल्लीकडून ही रक्कम मंजूर झाली आहे. त्यातील सभासद वर्गणी (१० टक्के) ३ कोटी १९ लाख, शासकीय भागभांडवल (४० टक्के) १२ कोटी ७८ लाख व निव्वळ कर्ज (५० टक्के) १५ कोटी ५८ लाख असे ३१ कोटी ९६ लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यातील पहिल्या हप्त्यापोटी शासकीय भागभांडवल ४ कोटी ९९ लाख व रासविनी कर्जापोटी ३ कोटी ९९ लाख असे ८ कोटी ९९ लाख रुपये देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. हे कर्ज देताना संस्थेची संपूर्ण मालमत्ता शासनास तारण म्हणून द्यावयाची आहे. संस्थेच्या सात-बारा उताऱ्यावर तशी नोंद करून त्याचे राज्यपालांच्या नावे गहाणखत करून घेण्याची जबाबदारी शासनाने वस्त्रोद्योग उपसंचालकांवर सोपविली आहे.संस्थेने त्यांचे स्वभागभांडवल संबंधित खात्यात जमा केल्यानंतरच व संस्थेस देण्यात आलेल्या कर्ज व शासकीय भागभांडवल रकमेच्या २० टक्के इतकी संस्थेच्या संचालकांची स्वमालमत्ता शासनाकडे तारण ठेवणे आवश्यक आहे. जोपर्यंत असे तारण प्राप्त होत नाही तोपर्यंत मंजूर रकमेची संस्थेस उचल करता येणार नाही.जवाहर कारखान्यास व्याज अनुदानहुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर सहकारी साखर कारखान्यास हंगाम २०१४-१५ मध्ये एफआरपी देण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या कर्जावरील व्याज अनुदानापोटी राज्य शासनाने एक कोटी ६७ लाख रुपये मंजूर केले आहेत. याचाही शासन आदेश शनिवारीच काढण्यात आला आहे.या सूतगिरण्यांनाही लाभएनसीडीसीकडून कोहिनूर ग्रो प्रोसेसिंग, डायमंड (माणगाव), मंगलमूर्ती (निमशिरगाव), दिलशाद गारमेंट (जांभळी, ता. शिरोळ), व्यंकटेश सूतगिरणी व लोटस् (इचलकरंजी) यांनाही कर्ज व अनुदान मंजूर झाले असून, त्याचे शासन आदेश निघाले आहेत.