शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

सिलिंडरचा भार झाला हलका

By admin | Updated: August 29, 2014 00:31 IST

निर्णयाचे स्वागत : आता वर्षभर अनुदानित बारा सिलिंडर; मोठ्या कुटुंबांचा त्रास होणार कमी

कोल्हापूर : प्रत्येक महिन्याला फक्त एकच अनुदानित गॅस सिलिंडर देण्याची अट रद्द केल्यामुळे आता सहा ते दहा व्यक्तींच्या कुटुंबाचा त्रास कमी होण्यास मदत होणार आहे. महिन्याला एकच सिलिंडर या अटीमुळे सणासुदीच्या दिवसांत अशा मोठ्या संख्येच्या कुटुंबाला गॅससाठी विनवण्या करण्याची वेळ येत असे, परंतु आता अशी वेळ तर येणार नाहीच शिवाय वेळेवरसुध्दा सिलिंडर मिळण्याची सोय झाली आहे. केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सर्वसामान्य ग्राहकांतून स्वागत करण्यात येत आहे.काँग्रेस आघाडी सरकारने यापूर्वीच एका ग्राहकाला वर्षाला बारा अनुदानित गॅस सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे; परंतु प्रत्येक महिन्याला एकच सिलिंडर देण्याची अट घालण्यात आली होती. त्यामुळे मुस्लिम समाजात रमजान महिन्यात तर हिंदू समाजात गणपती, दसरा व दिवाळी अशा सणासुदीला गॅस जादा लागतो. महिन्याचे सिलिंडर आणल्यानंतर ते जर महिना भरण्यात दहा-बारा दिवस बाकी असतील, तर त्यासाठी गॅस ग्राहकांना किंवा गॅस एजन्सी चालकांना विनवणी करावी लागायची किंवा शेजाऱ्यांचे उसने सिलिंडर घेण्याची वेळ येत होती. जर सिलिंडर मिळालेच नाही, तर मात्र अन्य पर्यायांचा शोध घ्यावा लागत होता. त्यामुळे ग्राहकांची दमछाक होत असे. ग्राहकांच्या या अडचणींची दखल घेत काल, बुधवारी कें द्र सरकारने वर्षभरात बारा सिलिंडर देण्याचा निर्णय घेण्यात आला. म्हणजेच एक सिलिंडर घेतल्यानंतर महिना भरण्याची वाट न बघता त्याला लगेच दुसरे सिलिंडर मिळणार आहे. याचाच अर्थ ग्राहकाला एका महिन्यात जरी दोन किंवा तीन सिलिंडर लागली, तरी ती मिळू शकणार आहेत. बारा अनुदानित सिलिंडरचा कोटा संपल्यानंतर वर्षाच्या शेवटी विनाअनुदानित सिलिंडर ग्राहकाला घेणे सोयीचे होणार आहे. सरकारच्या निर्णयामुळे ग्राहकांना आता कोणाकडे गॅस सिलिंडरसाठी विनवणी करावी लागणार नाही. थोडक्यात, बारा सिलिंडरचा निर्णय तोच असला, तरी सरकारने ती उपलब्ध करून देण्याची पद्धत बदलली आहे. (प्रतिनिधी)अध्यादेश प्राप्त होताच अंमलबजावणीकेंद्र सरकारने बुधवारी वर्षभरात के व्हाही बारा अनुदानित सिलिंडर देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश अद्याप आलेला नाही. तो ज्या दिवशी आपल्याकडे येईल त्या दिवसापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल. यासंदर्भात एजन्सीना सूचना देण्यात येतील. - मनीषा देशपांडे, सहायक पुरवठा अधिकारी