शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
‘माझा मुलगा वर्षावर मला भेटायला टॅक्सीने यायचा’; पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाच्या काळातील किस्सा सांगितला
3
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ६ विश्वासार्ह गुंतवणूक योजना; तुम्हाला कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाहीत
4
बांगलादेशात खळबळ! १७ वर्षांनंतर तारिक रहमान मायदेशी परतले; येताच मोहम्मद युनूस यांना केला फोन!
5
संपादकीय: पुन्हा चुकू अन् फुटू नका, राज-उद्धव आणि भाजप...
6
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
7
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
9
पीछेहाट कम्युनिस्ट पक्षाची, विचारसरणीची नव्हे!
10
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
11
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
12
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
13
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
14
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
15
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
16
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
17
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
18
डिलिव्हरी बॉयची कमाई किती? पाच वर्षांत कमविले दीड कोटी...
19
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
20
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

पंचवीस हजार रुग्णांना जीवदान : कोल्हापूर १०८ रुग्णवाहिकेचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 01:13 IST

आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’च्या सेवेत गतवर्षीपेक्षा यंदा पाचपटींनी वाढ झाली आहे. यावर्षी नऊ महिन्यांत तब्बल २५ हजार १९० रुग्णांना या सेवेचा लाभ झाला आहे.

ठळक मुद्देनऊ महिन्यांतील स्थिती; सर्वसामान्यांसाठी ‘वरदान’

गणेश शिंदे।कोल्हापूर : आपत्कालीन वैद्यकीय सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’च्या सेवेत गतवर्षीपेक्षा यंदा पाचपटींनी वाढ झाली आहे. यावर्षी नऊ महिन्यांत तब्बल २५ हजार १९० रुग्णांना या सेवेचा लाभ झाला आहे. किंबहुना त्यांचे प्राण वाचविण्यात या सेवेचा उपयोग झाला आहे. विशेषत: रस्त्यांवरील अपघात आणि प्रसूतिच्या रुग्णांवर प्राधान्याने उपचार झाले आहेत.

राज्यातील तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात १०८ नंबर रुग्णवाहिका सेवा २६ जानेवारी २०१४ ला सुरू झाली. रस्त्यांवरील अपघात, मारामारी, भाजणे, हृदयाचे आजार, विषबाधा, प्रसूती, विद्युत धक्का, मोठे अपघात, आत्महत्येचा प्रयत्न, गंभीर दुखापत आणि सर्वप्रकारचे रुग्ण अशा आपत्कालीन वैद्यकीय सेवा याद्वारे मिळतात.

गेल्या वर्षी एक जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१७ अखेर पाच हजार ४८७, तर यावर्षी याच कालावधीत तब्बल २५ हजार १९० अशा सर्व प्रकारच्या रुग्णांना सेवा मिळाली. आता त्यात तब्बल पाचपट वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे, कोणताही अपघात झाल्यास त्या रुग्णाला तत्काळ कोणत्याही रुग्णालयात तत्काळ घेऊन जाऊन उपचार करणे. तसेच गर्भवतीची प्रसूती कोणत्याही (सरकारी, खासगी) रुग्णालयात व्हावी, असे सरकारचे धोरण आहे. सध्या रस्त्यांवरील अपघातांचे व प्रसूतीचे ा्रमाण वाढले आहे. या नऊ महिन्यांत या रुग्णवाहिकेने आपत्कालीनमध्ये ४२ हजार २१७ जणांना सेवा दिली.

गतवर्षी ही सेवा १९ हजार ५५८ जणांना देण्यात आली. दरम्यान, घटना घडल्यापासून अवघ्या दहा मिनिटांत १०८ नंबरची रुग्णवाहिका घटनास्थळी येते. त्यासाठी आजऱ्यापासून ते वडणगेपर्यंत आणि कळेपासून ते जयसिंगपूरपर्यंत ही सेवा मिळते. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही रुग्णवाहिका उपयोगी पडत आहे.कोल्हापूर जिल्हा दृष्टिक्षेपात१०८ नंबरच्या ३६ रुग्णवाहिका(अ‍ॅडव्हान्स्ड सपोर्ट लाईफ आठ,तर बेसिक लाईफ सपोर्ट २८)वैद्यकीय अधिकारी - १२०चालक - ८४सर्वप्रकारची अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे 

समाजात जनजागृती झाल्याने कांही झाले तर लोक लगेच १०८ नंबर रुग्णवाहिकेची मदत घेत आहेत. त्यामुळे सेवा दिलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ती जास्तीत लोकांना उपयोगी पडावी असाच आमचा प्रयत्न आहे.- संग्राम मोरे, जिल्हा व्यवस्थापक, १०८ नंबर रुग्णवाहिका, कोल्हापूर.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीय