शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
3
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
4
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
5
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
6
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
7
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
9
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
10
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
11
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
12
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
13
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
14
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
16
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
17
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
18
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
19
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
20
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी

थेट पाईपलाईन आता संकेतस्थळावर

By admin | Updated: January 2, 2015 00:17 IST

महिन्याला माहिती ‘अपडेट’ : संभ्रम दूर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न

संतोष पाटील - कोल्हापूर -शासकीय परवानग्यांच्या फेऱ्यात अडकलेल्या काळम्मावाडी पाईपलाईनमधून प्रत्यक्षात शहरवासीयांना पाणी कधी मिळणार याचे नेमके उत्तर कोणाकडेच नाही. मात्र, पाईपलाईनबाबतची उलट-सुलट चर्चा व संभ्रमावस्था संपुष्टात आणण्यासाठी योजनेची सद्य:स्थिती महापालिकेच्या संकेतस्थळावर आज, गुरुवारपासून प्रशासनाने जाहीर केली. योजनेचे ठेकेदार ‘जीकेसी’ कंपनीला केंद्र सरकारच्या अटींप्रमाणे ४८८ कोटी रुपयांच्या कामाचा ठेका दिला. मात्र, महापालिकेने अ‍ॅडव्हान्स दिलेला नाही. ५२ किलोमीटरची पाईप सरकारी जागेतून जाते. सर्वेक्षणासह पाटबंधारे विभागाकडून १.३५ हेक्टर जमिनीचा ताबाही मिळाला आहे. लवकरच या कामास सुरुवात होणार आहे. केंद्राच्या नियमांचे पालन होणार आहे. नवीन वर्षात योजना मार्गी लागेल, त्यामुळे योजनेबाबत ‘नो टेन्शन’ असे महापालिका प्रशासनाचे वारंवार म्हणणे ‘बोलाचीच कढी’ ठरली. ठेकेदार, वाढीव डीएसआरमुळे योजनेचा वाढीव खर्च, सल्लागार कंपनीची भोंगळपण यातून पाईपलाईनची सुटका होईपर्यंत शासकीय जमिनीच्या अधिग्रहण व परवानगींच्या फेऱ्यात पाईपलाईन अडकली. वन्यजीव विभागाची परवागी नसल्याच्या कारणास्तव पहिला टप्पा वगळून दुसऱ्या टप्प्यातील काम सुरू करण्यात आले.संकेतस्थळावरील आजची माहितीपुईखडी ते शेंडापार्क येथे ९ कि.मी.च्या पाईपलाईनद्वारे ई वॉर्डला स्वतंत्र पाणीपुरवठा, कृषी विभागाच्या १ कि.मी. जागेतून जाणाऱ्या पाईपसाठी राहुरी विद्यापीठाची मंजुरी, कळंबा कारागृह व पाटबंधारे विभागाकडे जागेची परवानगी मागितली आहे. हैदराबाद येथे १९०० मीटर स्पायरल वेल्डेड पाईप तयार आहेत. लॅम्को कंपनीला जीआय पाईप पुरविण्याचा ठेका दिल्याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जलअभियंता मनीष पवार यांनी सांगितले. योजनेची अद्ययावत माहिती संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना समजेल. योजना पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला योजनेची अद्ययावत माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे. त्यामुळे योजना पारदर्शक होण्यास मदत होईल. - उपायुक्त विजय खोराटे