शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

कोल्हापुरात लिंगायत जनसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 01:10 IST

कोल्हापूर : ‘होय, आम्ही लिंगायत आहोत. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळविण्याकरिता तन-मन-धन लावून लढेन; एवढेच नाही तर प्रसंगी प्राण समर्पण करीन,’ अशी शपथ घेत लिंगायत समाजाने रविवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला. यामुळे कोल्हापुरातील प्रमुख रस्त्यांवर हातात भगवे ध्वज, डोक्यावर पांढरी टोपी आणि गळ्यात स्कार्फ घातलेला जनसागर उसळल्याचे चित्र दिसत ...

कोल्हापूर : ‘होय, आम्ही लिंगायत आहोत. लिंगायत धर्माला संवैधानिक मान्यता मिळविण्याकरिता तन-मन-धन लावून लढेन; एवढेच नाही तर प्रसंगी प्राण समर्पण करीन,’ अशी शपथ घेत लिंगायत समाजाने रविवारी कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढला. यामुळे कोल्हापुरातील प्रमुख रस्त्यांवर हातात भगवे ध्वज, डोक्यावर पांढरी टोपी आणि गळ्यात स्कार्फ घातलेला जनसागर उसळल्याचे चित्र दिसत होते. या महामोर्चामुळे दीड वर्षापूर्वी शहरात निघालेल्या मराठा मोर्चाच्या आठवणींना उजाळा मिळाला.लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी, तसेच अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय लिंगायत समाज समिती (कोल्हापूर)ने या राज्यव्यापी महामोर्चाची हाक दिली होती. या मोर्चाला ७७ समाज संघटनांनी पाठिंबा दिला होता; तर अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी समाजाच्या व्यासपीठावर हजेरी लावून स्वतंत्र लिंगायत धर्माला मान्यता मिळवून देण्याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.येथील ऐतिहासिक दसरा चौक येथून दुपारी दीड वाजता महामोर्चाला सुरुवात झाली. तत्पूर्वी सकाळी नऊ वाजल्यापासून समाजातील लोक दसरा चौकाकडे जात होते. यामध्ये शंभर, दोनशे, पाचशेच्या संख्येने येणारे जथ्थेही होते. हलगी, घुमके, कैताळाच्या गजराने मोर्चेकºयांचा उत्साह वाढविला. दुपारी बारा वाजता दसरा चौक गर्दीने फुलून गेला. नंतर हीच गर्दी पूर्वेकडे व्हीनस कॉर्नर, स्टेशन रोडपर्यंत, दक्षिणेकडे स्वयंभू गणेश मंदिरापर्यंत; तर उत्तरेकडे शहाजी महाविद्यालयापर्यंत वाढत गेली. त्यानंतर मात्र अनेकांना दसरा चौकाच्या दिशेने येणेही अशक्य झाले. मोर्चात समाजबांधव नातेवाइकांसह सहकुटुंब, सहपरिवार सहभागी झाले होते. प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर बसवेश्वरांची प्रतिमा असलेली पांढरी टोपी, गळ्यात भगवा स्कार्फ आणि हातात भगवा ध्वज दिसत होता.मोर्चाला ७७ समाजांनी तसेच संघटनांनी पाठिंबा दिला असला तरी दसरा चौकात ुभारलेल्या बसवपीठावर केवळ प्रातिनिधिक वक्त्यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली. महापौर स्वाती यवलुजे, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार राजेश क्षीरसागर,आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार सुजित मिणचेकर, आमदार सतेज पाटील, अकाली दलाचे सिमरनजित सिंह मान, माजी आमदार संजयसिंह घाटगे, ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील, आदींनी त्यांच्या भाषणात लिंगायत समाजाच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दिला. शाहू छत्रपती, कॅप्टन शिवाजीराव महाडकर यांनीही काहीवेळ मोर्चात सहभागी होऊन आपला पाठिंबा दिला. कोरणेश्वर महास्वामी, शिवलिंग शिवाचार्य स्वामींचे प्रतिनिधी बसवेश्वर येरटे, चन्नबसवानंद स्वामी, बसवलिंग पट्टदेवरु, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुरगाप्पा खुमसे , अकाली दलाचे सिमरनजितसिंग मान यांचीही यावेळी भाषणे झाली. दुपारी दीड वाजता सभेची सांगता होऊन मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेला. तेथे समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन दिले. या शिष्टमंडळात बसवलिंग पट्टदेवरू महास्वामी, कोरणेश्वर महास्वामी, सरलाताई पाटील, सिमरनजितसिंग मान, बसवेश्वर येरटे, ओमप्रकाश कोयटे, राजशेखर तंबाके, मनोहर पटवारी, विजयकुमार शेटे, आदींचा समावेश होता.पाठिंबा नव्हे, निवेदन स्वीकारायला आलोयपालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाहनांचा ताफा दसरा चौकात येताच संयोजकांचा घोषणा देण्यातील जोश अधिकच वाढला. संयोजकांपैकी एका निवेदकाने ‘जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आपल्या समाजाच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी आले आहेत’, असे एकदा सोडून दोन-तीन वेळा माईकवरून जाहीर केले. पालकमंत्र्यांचे या निवेदनाकडे लक्ष जाताच त्यांनी निवेदन करणाºयाला थांबवून ‘ मी इथे पाठिंबा द्यायला आलेलो नाही; तुमच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारायला आलो आहे,’ असे स्पष्ट केले. तेव्हा निवेदकाने त्याची चूक सुधारली.पंजाबातील सरदारांनी लक्ष वेधून घेतलेविशेष म्हणजे पंजाबातील अमृतसर येथील शिरोमणी अकाली दलाचे सिमरनजितसिंग मान यांच्यासह महेंद्रपाल सिंग, अमृतसिंग, हरपाजन सिंग काश्मिरी, रणजितसिंग सिंगेडा, कुलदीपसिंग पागोवाळ, कर्मसिंग मोईया, परगटसिंग मखू, रमिंदरसिंग जुवेसे, नवदीप सिंग, प्रतपाल सिंग, लालन मोहन, आदी सरदारांनी मोर्चात सहभागी होऊन लक्ष वेधून घेतले.सांगली, साताºयासह कर्नाटकातील बांधव सहभागीकोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपºयातून समाजबांधव मोर्चासाठी आले होते. यामध्ये शिरोळ, हातकणंगले, गडहिंग्लज येथून मोर्चाला आलेल्यांची संख्या सर्वाधिक होती. याशिवाय शेजारच्या सांगली, सातारा जिल्ह्यासह कर्नाटक राज्यातूनही लोक आले होते. परगावांहून वेगवेगळ्या वाहनांतून लोक आले होते. प्रत्येक तालुका, प्रत्येक गावातील लोक गटागटाने मोर्चासाठी आले होते.मी लिंगायत,माझा धर्म लिंगायतशहराच्या विविध भागांतून समाजबांधव जोशपूर्ण घोषणा देत दसरा चौकाकडे जात होते. ‘भारत देशा जय बसवेशा,’ ‘लिंगायतांची हाक, सर्वांची साथ,’ ‘मी लिंगायत, माझा धर्म लिंगायत,’ ‘लिंगायत समाजाला संवैधानिक मान्यता मिळालीच पाहिजे,’ ‘लिंगायत धर्माला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळालाच पाहिजे,’ ‘जगनजोती महात्मा बसवेश्वर महाराज की जय,’ अशा घोषणा मोर्चात दिल्या जात होत्या. घोषणांचा हा गजर मोर्चा संपेपर्यंत अखंडपणे सुरू होता.