शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘गावची तहान’ मिटविण्यासाठी धडपडतोय ‘प्रकाश’!

By admin | Updated: May 27, 2016 00:09 IST

टंचाईग्रस्त बुगडीकट्टी : स्वखर्चातून केले ओढापात्राचे रुंदीकरण, बांधला मातीचा बंधारा : लोकमत जलमित्र अभियान

राम मगदूम --गडहिंग्लज --तहानलेल्या गावाची, मायभूमीतील बाया-माणसांची आणि गुरा-ढोरांची तहान मिटविण्यासाठी दूरदेशी राहणारा एक सहृदयी माणूस धडपडतो आहे. स्वत:च्या मिळकतीतून त्याने गावच्या ओढ्याच्या पात्राचे रुंदीकरण केले असून, पाणी अडविण्यासाठी ओढ्यात मातीचा बांधदेखील घातला आहे. वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावकऱ्यांना उजेडाचा रस्ता दाखविणाऱ्या या भूमिपुत्राचे नाव आहे प्रकाश रामचंद्र रेडेकर..!बुगडीकट्टी! गडहिंग्लजच्या दुष्काळी पूर्वभागातील अडीच हजार लोकवस्तीचं गावं. गुडलकोप व बुगडीकट्टीच्या डोंगरात वसलेले आणि विकासापासून वंचित गाव. डोंगरातून वाहणारा ओढा हाच एकमेव जलस्रोत. त्यावर दगडी बंधारे घालून सरकारने गावाला पाणी देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेक वर्षांपूर्वी बांधलेले ते बंधारेही डागडुजीअभावी निकामी आणि गाळाने भरले आहेत. पात्रात झाडे-झुडपे वाढल्यामुळे आता ‘ओढा’ देखील शोधावा लागतो.गावाला ना नदी, ना तलाव. त्यामुळे ‘तेरणी’च्या तलावावर नळयोजना राबविली. पण, तलावही पूर्ण क्षमतेने भरत नाही. त्यामुळे ही नळ योजनादेखील कुचकामी ठरली आहे. गावातील सार्वजनिक विहीरदेखील आटली असून, केवळ अर्धा इंच पाणी असणाऱ्या एकमेव बोअरचे पाणीदेखील पिण्यायोग्य नाही. त्यामुळे आठवड्यातून दोनदाच येणाऱ्या नळाच्या पाण्यासाठी लहान-थोरांसह आया-बहिणींची धावाधाव होते. त्यांचे हाल संपावेत म्हणूनच ‘प्रकाश’ने हे काम केले आहे.डोंगर माथ्यावरून येणारे पाणी ओढ्यात अडविण्यासाठी नवीन बंधारे बांधावेत, यासाठी त्यांनी शासनदरबारी प्रयत्न केले. मात्र, त्यास सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळेच यंदाच्या दुष्काळाच्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवरच त्यांनी हे काम केले आहे. असे उपक्रम लोकसहभागातून राबवावेत, इतकीच त्यांची माफक अपेक्षा आहे.