शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात लाईट, कॅमेरा ॲक्शन सुरू, मालिकांच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 18:28 IST

दीड महिन्याच्या प्रयत्नांनंतर अखेर कोल्हापुरात मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींनुसार केर्ली येथे झी मराठी वाहिनीवरील ह्यतुझ्यात जीव रंगलाह्ण या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली.

ठळक मुद्दे कोल्हापुरात लाईट, कॅमेरा ॲक्शन सुरू मालिकांच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा

कोल्हापूर : दीड महिन्याच्या प्रयत्नांनंतर अखेर कोल्हापुरात मालिकेच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या अटी व शर्तींनुसार केर्ली येथे झी मराठी वाहिनीवरील ह्यतुझ्यात जीव रंगलाह्ण या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली.कोरोनाच्या संसर्गामुळे मार्च महिन्यात केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यावर चित्रपट व मालिकांचे चित्रीकरणही थांबवण्यात आले. त्यामुळे सर्वच वाहिन्यांचा टीआरपी सध्या घसरला आहे. कोल्हापुरात रुग्णसंख्या कमी असल्याने येथे चित्रीकरण सुरू व्हावे यासाठी व्यावसायिकांनी मोठे प्रयत्न केले होते.

पालकमंत्री सतेज पाटील यांनी पुढाकार घेऊन चित्रीकरणास परवानगी दिली. मात्र चॅनेल्सशी बोलणी, तांत्रिक बाबी, शासकीय मान्यता यांची पूर्तता करण्यास दीड महिना गेला. अखेर शुक्रवारपासून प्रत्यक्ष चित्रीकरणाला सुरुवात झाली. सोशल डिस्टन्सिंगची खबरदारी घेत सेटचे निर्जंतुकीकरण, कलाकार व कामगारांना मास्क, सॅनिटायझरचा वापर, थर्मल स्कॅनिंग, चित्रीकरणावेळी आवश्यक तेवढ्याच व्यक्तींची उपस्थिती या नियमांचे पालन करून चित्रीकरण करण्यात येत आहे.कोल्हापूरसोबतच सावंतवाडी येथे रात्रीस खेळ चाले या मालिकेच्या चित्रीकरणासाठीही येथील कलावंत व तंत्रज्ञांची टीम सेटवर पोहोचली आहे. तेथेही पुढील चार-पाच दिवसांत चित्रीकरण सुरू होईल.एकाच वेळी प्रदर्शनमालिकांचे चित्रीकरण सुरू झाले असले तरी त्याच्या एडिटिंगसाठी तांत्रिक बाबी पूर्ण होऊन टीव्हीवर मालिका प्रदर्शित होण्यासाठी किमान १५ दिवसांचा कालावधी लागणार आहे. सर्व मराठी मालिका एकाच वेळी सुरू करण्यात येणार असल्याने प्रेक्षकांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. 

टॅग्स :Shootingगोळीबारkolhapurकोल्हापूर