कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या स्वच्छता अभियानामध्ये दीड टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आला. मोहिमेचा ९१ वा रविवार असून एनएसएसचे विद्यार्थी, सामाजिक संघटनांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली.
शिये नाका मेनरोड, तांबट कमान संपूर्ण परिसर, संभाजीनगर बस स्टँड ते तलवार चौक, हॉकी स्टेडिअम ते भक्तीपूजानगर चौक, बिंदू चौक ते दसरा चौक, पंचगंगा घाट परिसर, सायबर चौक ते शिवाजी विद्यापीठ परिसर येथे स्वच्छता केली. स्वरा फाउंडेशनच्यावतीने जयंती पंपिंग स्टेशन येथे स्वच्छता, वृक्षारोपण केले. वृक्षप्रेमी संस्थेकडून टाकाळा, माळी कॉलनी येथील महापालिकेच्या उद्यानामध्ये स्वच्छता केली. स्वरा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रमोद माजगावकर, अमित देशपांडे, विवेकानंद कॉलेजचे एनएसएसचे आदित्य लातूकर, वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे आदी उपस्थित होते.
चौकट
महापालिकेची यंत्रणा
तीन जेसीबी, सहा डंपर, दोन आरसी गाड्या, तीन औषध फवारणी व दोन पाणी टँकर १५० कर्मचारी
फोटो : २४०१२०२१ कोल केएमसी स्वच्छता न्यूज१
ओळी : कोल्हापूर महापालिकेच्यावतीने रविवारी शहरात स्वच्छता मोहीम राबवली.
फोटो : २४०१२०२१ कोल केएमसी स्वच्छता न्यूज२
ओळी : महापालिकेने स्वच्छता केल्यानंतर त्या परिसरात धूर फवारणीही केली.