शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

लिफ्टच्या बहाण्याने महिलेची चेन लंपास, झटापटीत महिला जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2019 14:31 IST

ताराराणी चौकापासून तावडे हॉटेलपर्यंत महिलेस दुचाकीवर लिफ्ट देणाऱ्या तरुणाने या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पलायन केले.

कोल्हापूर  : ताराराणी चौकापासून तावडे हॉटेलपर्यंत महिलेस दुचाकीवर लिफ्ट देणाऱ्या तरुणाने या महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोनसाखळी हिसकावून पलायन केले. सोमवारी सकाळी हा प्रकार घडला. झटापटीत रस्त्यावर ढकलून दिल्याने महिला गंभीर जखमी झाली. कविता कुमार आवटी (वय ४३ रा. आष्टा वाळवा, जि.सांगली) यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.याबाबत माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील आष्टा-वाळवा येथे राहणाऱ्या कविता आवटी या शिवाजी पार्क येथील डॉ. आर. सी. पाटील यांच्याकडे स्वयंपाकी म्हणून काम करतात. सकाळी काम झाल्यानंतर त्या पुन्हा गावी जातात. त्याच्या पतीने पाच वर्षापूर्वी निधन झाले आहे. त्यांना दोन मुले असून घरची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

सोमवारी सकाळी ८.४५ वाजता कविता आवटी या गावी जाण्यासाठी ताराराणी चौकात अयोध्या हॉटेलच्या दारात थांबल्या होत्या. नेहमीप्रमाणे त्या एखाद्या दुचाकीस्वारकडे तावडे हॉटेलपर्यंत सोडण्यासाठी लिफ्ट मागत होत्या. २२-२४ वर्ष वयोगटातील एक दुचाकीस्वार तेथे आला. त्याने आवटी यांना दुचाकीवर घेतले. तावडे हॉटेलजवळ गेल्यानंतर दुचाकीस्वार तरुण दुकानात गेला. तेथून काहीतरी वस्तू घेऊन तो दुचाकीजवळ आला. त्यानंतर या महिलेस दुचाकीवर बसवून पुलावरून मुख्य रस्त्यावर नेले. 

तेथे महिलेस खाली उतरून तिच्या गळ्यातील दीड तोळ्याची सोन्याची चेन हिसडा मारून काढून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने विरोध केला. या झटापटीत महिलेस ढकलून दिल्याने ती खाली पडली. तिच्या डोके, चेहरा व हातास जखमा झाल्या. त्यानंतर चोरटा चेन घेवून पळून गेला. कविता आवटी या रस्त्यावर रडत बसल्या होत्या. रिक्षा चालकाने त्यांना सीपीआर रुग्णालयात आणून सोडले. उपचार घेतल्यानंतर या महिलेने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.