शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

उपनगरांत जनजीवन विस्कळीत

By admin | Updated: July 10, 2016 01:48 IST

पावसाची संततधार : रस्ते झाले जलमय; बुदिहाळनगर, दत्तोबा शिंदेनगरमधील घरांत पाणी

कळंबा : शहर आणि उपनगर परिसरात शनिवारी दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. महापालिकेचे पावसाळी पूर्वकामाचे नियोजन कागदोपत्रीच झाल्याचे या पावसाने पुन्हा सिद्ध झाले. उपनगरांतील रस्ते पाण्याखाली व नागरी वस्त्यांत पाणी शिरण्याच्या घटना घडल्या.उपनगरांची रचना उंच, सखल आहे. त्यात पालिकेने यंदाही नालेसफाईच्या प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्याने क्रशर चौक ते लडगे चौक रस्ता, तांबड कमान ते जुना वाशीनाका रस्ता गुडघाभर पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली.राजलक्ष्मीनगर प्रभागातील शाम हौसिंग सोसायटी, दळवी कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी, सोमराज कॉम्प्लेक्स, जुईनगर, जलदर्शन कॉलनी, सुर्वेनगर प्रभागातील, बुदिहाळनगर, ज्योतिर्लिंग कॉलनी, दत्तोबा शिंदेनगर या नागरी वस्त्यांत, तर काही ठिकाणी घरांत पाणी शिरले. पांडुरंगनगरी लगतचा ओढा भरल्याने ओढ्यालगत असणारे सांडपाणी प्रक्रिया केंद्रच पाण्याखाली गेल्याने घनकचरा मिश्रित पाणी सरळ रंकाळ्यात मिसळत होते. महामार्गावर वाहतूक विस्कळीतवाहतूक कोंडीमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. ही रांग सांगली फाटापर्यंत पोहोचली होती. सांगली फाटा जाम झाला. त्यातच पुण्याहून सेवामार्गाने येणारा कंटेनर सेवामार्गावर बंद पडला. तसेच पूर्वेकडील सेवामार्गावरून वाहतूक सुरू होती; पण त्या सेवामार्गावरून येणाऱ्या ट्रकवर झाड कोसळले. त्यामुळे पुन्हा वाहतूक ठप्प झाली.४वाहतूक सुरळीत करण्यासाठी शिरोली पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी सांगली फाटा येथे होते, तर महामार्गाचे पोलिस फिरकलेच नाहीत. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी तीन ते चार तास लागले. सायंकाळी सात वाजता वाहतूक व्यवस्था सुरळीत झाली.शिरोली : पुणे-बंगलोर महामार्गावर जोरदार पावसामुळे भुयारी मार्गावर पाणी साचून आणि किरकोळ अपघातामुळे तावडे हॉटेल ते शिरोली सांगली फाटापर्यंत तीन तास वाहतूक विस्कळीत झाली होती. दुपारी तीन वाजता तावडे हॉटेल येथील भुयारी मार्गात पाणी साचल्याने येथे वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे महामार्गावरून कोल्हापूर शहर आणि गांधीनगरकडे जाणारी वाहतूक व्यवस्था कोलमडली.