शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गवताच्या चार पेंढ्यांसाठी गेला उमद्या तरुणाचा जीव, आरडेवाडीतील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2020 11:56 IST

गाव करवीर तालुक्यातील आरडेवाडी. डोंगराच्या कडेला असलेली फक्त सहा गुंठे जमीन. त्यात पावसाळ्यातच फक्त गवत येते. त्याची किंमत केली तरी कसेबसे हजार-दोन हजार रुपये; परंतु ते कापायचे कुणी म्हणून सख्खे चुलतभाऊ एकमेकांशी भिडले आणि एका उमद्या तरुणाचा त्यात हकनाक बळी गेला.

ठळक मुद्दे गवताच्या चार पेंढ्यांसाठी गेला उमद्या तरुणाचा जीव, आरडेवाडीतील घटना दोन्ही कुटुंबांतील पंधरा जणांना अटक

मच्छिंद्र मगदूम सांगरुळ : गाव करवीर तालुक्यातील आरडेवाडी. डोंगराच्या कडेला असलेली फक्त सहा गुंठे जमीन. त्यात पावसाळ्यातच फक्त गवत येते. त्याची किंमत केली तरी कसेबसे हजार-दोन हजार रुपये; परंतु ते कापायचे कुणी म्हणून सख्खे चुलतभाऊ एकमेकांशी भिडले आणि एका उमद्या तरुणाचा त्यात हकनाक बळी गेला.

दोन्ही कुटुंबांतील पंधरा जणांना अटक झाली असून त्यांना आता चार-पाच वर्षे न्यायालयाच्या चकरा माराव्या लागणार आहेत. एक मराठा...लाख मराठा म्हणून एकीची मूठ आवळणाऱ्या मराठा समाजातील असे भाऊबंदकीतील वाद कसे संपवायचे, याचाच विचार होण्याची आता गरज आहे.आरडेवाडी हे सातशे लोकवस्तीचे गाव. हे गाव डोंगराच्या पायथ्याला असल्यामुळे बागायती क्षेत्र कमी यामुळे बहुतांशी लोक हे शहरातील खासगी कंपनीमध्ये कामाला जातात. गावचे शेतीचे क्षेत्रफळ अल्प असल्याने अल्पभूधारक शेतकरी आहेत. वाकरेकर भावकीची एकूण आठ कुटुंबे. सख्खे चुलतभाऊ असणाऱ्या कुटुंबीयांमध्ये काही दिवसांपूर्वी सहा गुंठे डोंगरातील जमिनीतील गवत कापण्यावरून मारामारी झाली. त्यामध्ये एका २४ वर्षे वयाच्या एकुलत्या तरुणाचा खून झाला तर दोघे गंभीर जखमी आहेत.या घटनेत गावांतील, पै-पाहुण्यांची किंवा जाणत्या लोकांनी सामंजस्याची भूमिका घेऊन वाद मिटवायला हवा होता; परंतु तसे घडले नाही. भाऊबंदकीचा शाप हा एक समाजाला लागलेला कलंक आहे. दोन्ही कुटुंबांत बरीच वर्षे या जमिनीसाठी वाद चालू होता. एका कुटुंबात वीस तर दुसऱ्या कुटुंबात चौदा सदस्य. ही ताकद समजून दोन्ही कुटुंबे एकमेकांचा द्वेष करू लागली. त्यातून दोन्ही कुटुंबांत टोकाची ईष्या निर्माण झाली.

पाय कुणी मागे घ्यायला तयार नव्हते. शेतीवरून दोन्ही कुटुंबांत अनेक वेळा यापूर्वीही वाद झाले. एकमेकांच्या पिकांची नासधूस करण्यासारखे प्रकार घडले आणि आता शेवटचे टोक गाठले गेले व एक उमलणारे आयुष्य संपले. आता दोन्ही कुटुंबांतील सर्व कर्ती माणसे अटकेत असून घरात फक्त महिला आणि लहान मुलेच आहेत.

त्यामुळे फक्त गवताच्या चार पेंढ्यांसाठी हा वाद करून या दोन कुटुंबांना काय मिळाले याचा विचार करण्याची गरज आहे. या घटनेतून समाजाने बोध घेऊन अशा घटना कशा टाळता येतील हे पाहिले पाहिजे. मराठा समाजापुढील हे महत्त्वाचे आव्हान आहे.

टॅग्स :Murderखूनkolhapurकोल्हापूर