शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरातून विमानसेवेला पुन्हा परवाना, मार्ग मोकळा; आता ७२ आसनी विमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 16:25 IST

थ्रीसी-व्हीएफआर परवाना मिळाल्याने कोल्हापुरातून नागरी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूर विमानतळाला परवाना मिळाल्याची माहिती भारतीय नागरी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कळविली असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांना सांगितले.

ठळक मुद्देकोल्हापुरातून विमानसेवेला पुन्हा परवाना, मार्ग मोकळाआता होणार ७२ आसनी विमानाचे उड्डाण

कोल्हापूर : थ्रीसी-व्हीएफआर परवाना मिळाल्याने कोल्हापुरातून नागरी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कोल्हापूरविमानतळाला परवाना मिळाल्याची माहिती भारतीय नागरी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कळविली असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांना सांगितले.कोल्हापूर विमानतळावरील धावपट्टीच्या त्रुटींची पूर्तता झाली नसल्याने या ठिकाणी मोठी विमाने उतरण्याचा परवाना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीजीसीए) मिळाला नाही. अलायन्स एअर कंपनीकडून ७२ आसनी विमानाच्या माध्यमातून हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर विमानसेवा दि. १ नोव्हेंबरपासून सुरू केली जाणार होती. मात्र, हा परवाना मिळाला नसल्याने या सेवेची सुरुवात झाली नाही.त्यातच ‘एअर डेक्कन’ची सेवा रद्द करण्यात आली. अशा परिस्थितीत कोल्हापूर विमानतळाच्या हवाई परवान्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित झाला. त्यामुळे कोल्हापूरची विमानसेवा बंद झाली. त्यानंतर विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी विमानतळाची पाहणी केली.

विमानतळ व्यवस्थापनाने विविध तांत्रिक बाबींची पूर्तता केली. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित पाहणीचा अहवाल नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात ‘डीजीसीए’ला सादर केला. त्यानंतर ११ दिवसांनी शुक्रवारी थ्रीसी-व्हीएफआर परवाना मिळाला आहे. हा परवाना मिळाल्याने आता नागरी विमानसेवा सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोल्हापूर-मुंबई, बंगलोर सेवा सुरू होईलया परवान्यासाठी नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू आणि ‘डीजीसीए’च्या वरिष्ठ अधिकाऱ्याची भेट घेतली. त्याचे फलित म्हणून कोल्हापूर विमानतळाला थ्रीसी-व्हीएफआर परवाना देण्यात आला. त्यामुळे कोल्हापुरातून ७२ आसनी विमानाचे उड्डाण होण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

‘अलायन्स एअर’ची हैदराबाद-कोल्हापूर-बंगलोर आणि इंडिगो कंपनीची हैदराबाद-कोल्हापूर-तिरूपती, कोल्हापूर-मुंबई या मार्गावर विमानोड्डाण सुरू होईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Airportविमानतळkolhapurकोल्हापूरDhananjay Bhimrao Mahadikधनंजय भीमराव महाडिक