शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

लेटकमर्सची संघटनेच्या खांद्यावर बंदूक

By admin | Updated: November 23, 2014 00:46 IST

जिल्हा परिषद : पदाधिकारी, कर्मचारी संघर्ष पेटणार; दबावतंत्राचा प्रयोग

 कोल्हापूर : येथील जिल्हा परिषदेमधील काही कर्मचारी ‘आम्ही जनतेचे सेवक आहोत’ हे विसरून मनमानी पद्धतीने कधीही येतात आणि कधीही जातात. ते कार्यालयातील प्रस्थापित बनले आहेत. त्यांना दुखाविण्याची हिंमत साहेबालाही होत नाही. उपाध्यक्ष शशिकांत खोत यांनी प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी लेटकमर्सना कार्यालयाच्या बाहेरच रोखल्याने ‘इगो’ दुखावला. लेट आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी संघटनेच्या खांद्यावर बंदूक ठेवत आंदोलनाच्या माध्यमातून दबावतंत्राचा प्रयोग झाला. याला अप्रत्यक्षपणे वरिष्ठ अधिकारीही खतपाणी घालत असल्याचे पदाधिकारी यांच्या निदर्शनास आले आहे. लेटकमर्सना पाठीशी घालणारे अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या ‘रडारवर’ येणार आहेत. यामुळे पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी संघर्ष पेटणार आहे. जिल्हा परिषदेमध्ये शासकीय सुटी वगळता अन्य दिवशी जिल्ह्यातून अनेक लोक कामानिमित्त येत असतात. जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या चंदगड तालुक्यातील सर्वसामान्य व्यक्तीला परिषदेमध्ये कामासाठी दहा वाजेपर्यंत पोहोचण्यासाठी पहाटे पाच वाजता घर सोडावे लागते. इतकी धडपड करून जिल्हा परिषदेच्या कार्यालयात आल्यानंतर संबंधित विभागामध्ये साहेब खुर्चीवर असतीलच आणि काम होईलच याची शाश्वती नाही. कार्यालयात आल्यानंतर पाट्या टाकणे, काम सोडून चहा व अन्य कारणांसाठी फिरत राहणे, मोबाईलवर गप्पा मारण्यात मग्न असणे, हे नित्याचेच आहे. मॅन्युअल हजेरी पत्रकात अ‍ॅडजेस्टमेंट करता येते. त्यामुळे शासनानेच बोयामेट्रिक हजेरी कार्यान्वित केली. तरीही परिषदेधील विविध विभागात मॅन्युअल हजेरी पत्रकाचा वापर होत असल्यास सामान्य प्रशासनाचे प्रमुख डोळ्यांवर झापड ओढून इतके दिवस का गप्प होते, असाही प्रश्न ऐरणीवर आला आहे. गतिमान प्रशासनाचा टेंबा मिरवायचे आणि प्रत्यक्षात कामासाठी येणाऱ्याला हेलपाटे मारायला लावायचे हा प्रशासनाचा जुनाच अनुभव आहे. परिषदेमधील बहुतांश विभागात एजंटांना मान मिळतो, त्यांच्यामार्फत आलेली कामे रात्री उशिरापर्यंत करून दिली जातात, अशा तक्रारी खासगीत बोलताना जिल्हा परिषदेचे सदस्यच करीत असतात. मात्र, परिषदेच्या इतिहासात इतक्या धाडसीपणे आणि व्यापकपणे लेटकमर्सना धडा शिकविण्याची हिंमत यापूर्वी कोणीही केली नव्हती. त्यामुळे लेटकमर्सची संख्या ११५ पर्यंत जाऊन पोहोचली. (प्रतिनिधी)