राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा येथे अभिषेक डोंगळे युवा शक्ती आणि गोकूळचे संचालक अरुण डोंगळे यांच्या विद्यमाने राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तालुका वैधकीय अधिकारी डॉ. आर. आर. शेट्टी, वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील, सहकार क्षेत्रातील योगदानाबद्दल ए. डी. पाटील गुडाळकर, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक नितीन पाटील यांच्यासह कला, क्रीडा, दूध उत्पादन, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला, गोकूळचे संचालक अरुण डोंगळे यांनी दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून हजारो कुटुंबीयांना रोजगाराची संधी देऊन ग्रामविकासासाठी हातभार लावला आहे. त्यांचे काम प्रेरणादायी असल्याचे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले. शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी अभिषेक डोंगळे युवा शक्तीने समाजहिताचे काम करणाऱ्या लोकांच्या गौरवाचे काम प्रेरणादायी असल्याचे सांगितले, सुरेश कुराडे, आमदार अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी गोकूळचे संचालक अरुण डोंगळे, फिरोजखान पाटील, नानासो पाटील, धनाजी पाटील, सुहास डोंगळे, राजेंद्र चव्हाण उपस्थित होते.
फोटो ओळ - अर्जुनवाडा (ता. राधानगरी) येथे पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना राजेंद्र पाटील यड्रावकर. व्यासपीठावर युवा शक्तीचे अध्यक्ष अभिषेक डोंगळे, गोकूळचे संचालक अरुण डोंगळे, आमदार जयंत असगावकर, आमदार अरुण लाड, आमदार प्रकाश अबीटकर, ए. वाय. पाटील आदींसह मान्यवर
(छाया : नामदेव कुसाळे)