शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

माणसं जगली का मेली ते तरी बघायला या, मुश्रीफांचा चंद्रकांत पाटील यांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 19:09 IST

ज्या कोल्हापूर जिल्ह्यानं पदवीधरच्या निवडणुकीत दोन वेळा आमदार केलं, नंतर ते मंत्री झाले, कोल्हापूरचे ते भूमीपूत्र आहेत. त्यांनी कोरोनामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील माणसं जगली का मेली ते तरी बघायला यावं असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांना लगावला.

ठळक मुद्देकोरोनामुळं माणसं जगली का मेली ते तरी बघायला या हसन मुश्रीफ यांचे चंद्रकांत पाटील यांना टोला 

कोल्हापूर - ज्या कोल्हापूर जिल्ह्यानं पदवीधरच्या निवडणुकीत दोन वेळा आमदार केलं, नंतर ते मंत्री झाले, कोल्हापूरचे ते भूमीपूत्र आहेत. त्यांनी कोरोनामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील माणसं जगली का मेली ते तरी बघायला यावं असा टोला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंदकांत पाटील यांना लगावला.राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट आणि डॉक्टर असोसिएशन यांच्यावतीने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना फेस शील्डचे शासकीय विश्रामगृहावर वितरण करण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना हे आव्हान दिले.मुश्रीफ म्हणाले, चंदकांत पाटील यांची मी मुलाखत पाहिली आहे. यामध्ये दोन तीन वेळा कोल्हापूरचा उल्लेख आला आहे. गेल्या ५० दिवसात कोल्हापूरची माणसं काय करत आहेत, ती जगली का मेली हे सुध्दा बघायला पाटील आलेले नाहीत. आम्ही सत्तेवर असतो तर यापेक्षा अधिक चांगलं काम केलं असतं असं म्हणणाऱ्या पाटील यांनी पहिल्यांदा कोल्हापुरात यावं. सर्व पातळ्यांवर कोल्हापूर जिल्ह्यात कसं चागलं काम सुरू आहे ते पहावं.महापुरावेळी आम्ही चांगल काम केलं असं पाटील सांगत आहेत याची खिल्ली उडवताना मुश्रीफ म्हणाले, जेव्हा चिखलीत पाणी शिरत होतं तेव्हा मुख्यमंत्री आणि यांची महाजनादेश यात्रा सुरू होती.  माणसं बुडायला लागलीत तेव्हा यात्रा सोडून कोल्हापूरला येण्याचे आवाहन मी केले होते. त्यानंतर ते किती दिवसांनी आले, त्यांची टर कशी उडवली गेली, त्यांना काढता पाय कसा घ्यावा लागला हे सगळं जनतेला माहिती आहे.

या महापुरातील मेलेल्या जनावरांचा शाप त्यांना लागला. महापुरानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी, त्यांना अनुदान या सगळ्या गोष्टी आम्ही सत्तेवर आल्यानंतर केल्या.त्यांनी आता लक्ष्मीदर्शन करावंचंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या मंत्रीपदाच्या काळात कोल्हापुरात अनेकांना लक्ष्मीदर्शन घडवले. आता या कोरोनाच्या संकटावेळी त्यांनी कोल्हापुरात यावं आणि इथल्या गोरगरीबांना पुन्हा एकदा लक्ष्मीदर्शन घडवावं असाही टोला मुश्रीफ यांनी पाटील यांना लगावला. 

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर