शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

पट्टणकोडोलीत क्रीडासंकुल उभे करू

By admin | Updated: March 1, 2017 00:40 IST

संभाजीराजे : राज्यस्तरीय वजनी गट कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन; ३५० मल्लांचा सहभाग

पट्टणकोडोली : पट्टणकोडोलीमध्ये कुस्तीला पूर्वीचे वैभव परत आणून कुस्ती जिवंत ठेवण्याचे काम येथील शिवराय व्यायाम मंडळ व एस. एम. ग्रुपच्यावतीने सुरू आहे. त्यामुळे राजकारण सोडून कुस्तीसाठी एकत्र येऊन सर्वांनी याठिकाणी ग्रामीण क्रीडासंकुल उभे करू, असे प्रतिपादन करून खासदार संभाजीराजे यांनी कुस्तीसाठी कायपण, असा नारा देत कुस्तीसाठी आपण अहोरात्र उपलब्ध असणार असल्याचे सांगितले.पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे राष्ट्रीय तालीम संघ कोल्हापूरच्या मान्यतेने शिवराज व्यायाम प्रसारक मंडळ व एस. एम. ग्रुप यांच्यावतीने ठेवण्यात आलेल्या राज्यस्तरीय वजनी गट कुस्ती स्पर्धेवेळी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर उपस्थित होते.यावेळी संभाजीराजे म्हणाले, पट्टणकोडोली नगरीत श्री विठ्ठल बिरदेव मंदिराच्या पटांगणात पूर्वीपासूनच कुस्तीचे मैदान होते. शाहू महराजांनी कुस्तीला राजाश्रय दिला आहे. आपण ही कुस्ती मोठी करण्यासाठी प्रयत्न करून खासदार फंडातून शक्य ती मदत करणार आहोत. स्पर्धेवेळी ५५ जुन्या मल्लांचा मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला, तर स्पर्धेमध्ये ३५० मल्लांनी सहभाग घेतला आहे. यावेळी सरपंच खाना अवघडे, उपसरपंच जयश्री कांबळे, ग्रामपंचायत सदस्य संतोष शेळके, पोपट बाणदार, मदन चौगुले, साताप्पा भवान, आण्णा जाधव, निसार मुल्ला, राजू सूर्यवंशी, राजू माने, सर्व समाजाचे अध्यक्ष, मंडळाचे कार्यकर्ते, स्पर्धक, पंच व ग्रामस्थ उपस्थित होते. गोगा बाणदार यांनी सूत्रसंचालन केले. (वार्र्ताहर)पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथे राज्यस्तरीय वजनी गट कुस्ती स्पर्धेवेळी दोन मल्लांमध्ये खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली. यावेळी महाराष्ट्र केसरी विष्णू जोशीलकर, सरपंच खाना अवघडे, साताप्पा भवान, राजू सूर्यवंशी, गोगा बाणदार व पंच उपस्थित होते.