शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

शिरोलीला हद्दवाढीतून वगळू

By admin | Updated: June 17, 2014 01:45 IST

हर्षवर्धन पाटील : ‘क’ वर्ग नगरपालिका मंजूर करण्याची ग्वाही

शिरोली : शिरोलीला हद्दवाढीत जायचे नसेल तर हद्दवाढीतून शिरोलीचे नाव निश्चित वगळू व ‘क’ वर्ग नगरपालिकेसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बैठक घेऊन नगरपालिका मंजूर करू, असे आश्वासन पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आमदार महादेवराव महाडिक यांना दिले. आमदार महाडिक शिरोली ग्रामपंचायतीचे शिष्टमंडळ घेऊन कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृहात पालकमंत्र्यांना भेटले. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटीलही उपस्थित होते. यावेळी आमदार महाडिक व पालकमंत्री पाटील यांच्यात हद्दवाढीबाबत चर्चा झाली. यावेळी महाडिक म्हणाले, शिरोली गावचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सध्या शिरोलीतील सर्व रस्ते चकाचक आहेत. गावाला मुबलक पाणी मिळावे म्हणून राष्ट्रीय पेयजल योजना राबविली आहे, तर दुसरीकडे महानगरपालिका शेजारच्या उपनगरांनाही सुविधा देऊ शकत नाही. मग आम्हाला काय सुविधा देणार? शिरोली गाव हे वडगाव मतदारसंघातील सर्वांत मोठे गाव आहे. या गावावर वडगाव मतदारसंघाच्या आमदाराचे भवितव्य ठरते. त्यामुळे हे गाव महानगरपालिकेत जाऊन चालणार नाही. कदमवाडी, भोसलेवाडी, कसबा बावडा, जाधववाडी यांना महानगरपालिकेत घेतले आहे. या उपनगरांचा अद्याप विकास झालेला नाही. तसेच शिरोली गाव हद्दवाढीत गेले तर शेजारील असणाऱ्या एम.आय.डी.सी.लाही त्याचा मोठा त्रास होणार आहे. उद्योगांना एल.बी.टी.ही लागणार आहे. त्यामुळे हे उद्योग परराज्यांत जातील. म्हणून आम्हाला हद्दवाढ नको आहे. आम्हाला पेठवडगावप्रमाणे ‘क’ वर्ग नगरपालिका मंजूर करून द्या, अशी मागणी शिष्टमंडळाच्यावतीने महाडिक यांनी पालकमंत्री पाटील यांच्याकडे केली. यावर मंत्री पाटील म्हणाले, एवढ्या अडचणी शिरोली गावाला व ग्रामस्थांना येत असतील तर निश्चितच शिरोली गाव हद्दवाढीतून वगळू. मुख्यमंत्री चव्हाण यांच्याबरोबर मुंबईत ताबडतोब बैठक घेऊन हा निर्णय घेऊ. तसेच या बैठकीला नगरविकास मंत्र्यांना बोलावून ‘क’ वर्ग नगरपालिका मंजूर करू, असे आश्वासनही आमदार महाडिक व शिरोली ग्रामपंचायत आणि शिष्टमंडळाला दिले. यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, शिरोली ग्रामपंचायतीचे सलीम महात, अनिल खवरे, सुरेश यादव, डॉ. सुभाष पाटील, विजय जाधव, शिवाजी खवरे, लियाकत गोलंदाज, विजय चव्हाण, गोविंद घाटगे, शिवाजी समुद्रे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)