शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

होळी लहान करूया, पोळी दान करूया, उद्या होळी, टिमक्यांनी सजली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 11:32 IST

आपल्यातील वाईट प्रवृत्तींचा नाश करून चांगल्याचा स्वीकार करण्याचा संदेश देणारी होळी उद्या, बुधवारी सर्वत्र साजरी होत आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी हा सण निसर्गाचा ऱ्हास न करता होळी लहान करूया, पोळी दान करूया अशी हाक दिली आहे.

ठळक मुद्देहोळी लहान करूया, पोळी दान करूयाउद्या होळी, टिमक्यांनी सजली बाजारपेठ

कोल्हापूर : आपल्यातील वाईट प्रवृत्तींचा नाश करून चांगल्याचा स्वीकार करण्याचा संदेश देणारी होळी उद्या, बुधवारी सर्वत्र साजरी होत आहे. पर्यावरणप्रेमी नागरिकांनी हा सण निसर्गाचा ऱ्हास न करता होळी लहान करूया, पोळी दान करूया अशी हाक दिली आहे.होलिका दहन या पारंपारिक कथेशी जोडलेल्या या सणाला घराघरांत पुरणपोळी बनवली जाते. दुपारी अथवा सायंकाळी दारात शेणी लावून होळी पेटवली जाते. त्याभोवतीने लहान मुले टिमक्या वाजवत गोल फिरतात. होळीपासून खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात होते, असे म्हणतात. मात्र, या निमित्ताने पुरणपोळीसारखे सुग्रास जेवण होळीत घातले जाते.

मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होते, एरंडेल या औषधी वनस्पतीला आगीच्या भक्ष्यस्थानी घातले जाते शिवाय शेणी, लाकूड अशा नैसर्गिक साधनसंपत्तीचाही मोठ्या प्रमाणात ऱ्हास होतो. त्याचा निसर्गावर आणि पर्यावरणावर होत असलेला परिणाम लक्षात घेऊन गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणप्रेमी नागरिक व संस्थांनी पर्यावरणपूरक होळीचे आवाहन केले आहे.महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने होळी लहान करूया, पोळी दान करूयाची हाक देण्यात आली आहे. पुरणाची पोळी आगीत अर्पण करण्याऐवजी एखाद्या गरजूला द्या म्हणजे त्याच्या भूकेची आग शांत हेईल. होळीत शेणीऐवजी वाळलेला कचरा जाळा असे आवाहन करण्यात आले आहे.

स्मशानभूमीला लाखो शेणीपर्यावरणपूरक होळी या आवाहनाला नागरिकांचाही आता सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यादिवशी अनेक तालीम मंडळे व संस्थांच्यावतीने पंचगंगा स्मशानभूमीला शेणी दान केल्या जातात. लाखोच्या संख्येने जमा होणाऱ्या या शेणीमुळे पुढील काही महिने शेणीची कमतरता भासत नाही. फुलेवाडी येथील मानसिंग पाटील युवा मंचच्यावतीने स्मशानभूमीसाठी ५१ हजार शेणीदान करण्यात येणार आहेत.टिमक्यांची खरेदीया सणाला टिमक्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. चामड्यापासून बनवल्या जाणाऱ्या या टिमक्यांची जागा आता प्लास्टिकच्या टिमक्यांनी व ताशाने घेतली आहे. आकर्षक रंगातील या टिमक्या व ताशा ४० रुपयांपासून अगदी शंभर दोनशे रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. शहरातील मिरजकर तिकटी, पापाची तिकटी, महापालिका परिसरात मांडलेल्या या टिमक्यांनी होळीची चाहूल दिली आहे. 

 

टॅग्स :Holiहोळीkolhapurकोल्हापूर