शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

‘जयप्रभा’ भूखंड विभाजनाचा डाव हाणून पाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 17:47 IST

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अस्मितेचा मानबिंदू असणाऱ्या जयप्रभा स्टुडिओच्या भूखंडाचे विभाजन करण्याचा डाव हाणून पाडू, असा इशारा अखिल भारतीय सिने ...

ठळक मुद्दे‘जयप्रभा’ भूखंड विभाजनाचा डाव हाणून पाडूसिने वर्कर्स असोसिएशनचा इशारा, इंचभरही जागा सोडणार नाही

कोल्हापूर : कोल्हापूरच्या अस्मितेचा मानबिंदू असणाऱ्या जयप्रभा स्टुडिओच्या भूखंडाचे विभाजन करण्याचा डाव हाणून पाडू, असा इशारा अखिल भारतीय सिने वर्कर्स असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष संजय पाटील यांनी पत्रकाद्वारे दिला आहे.पत्रकात म्हटले, जयप्रभा स्टुडिओच्या भूखंडाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव हा चित्रपंढरीला काळिमा फासणारा आहे. स्टुडिओची मूळ जागा आणि वास्तू यांचे विभाजन करण्याचा डाव आम्ही संघटनेतर्फे हाणून पाडू.

हेरिटेज समितीने मूळ वास्तूच्या संवर्धनाबाबत आराखडा सादर करावा, असे आदेश दिले असतानाही त्याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही. उच्च न्यायालयानेही ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्याचा आदेश दिलेला आहे. स्टुडिओच्या सव्वातीन एकर जागेमागे लागण्यापेक्षा महापालिकेने विकासकाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.

प्रशासनाला हाताशी धरून या भूखंडात टोलेजंग इमारत उभारण्याचा विकासकाचा घाट सुरू आहे. हा भूखंड हडपण्यासाठी सुरू असलेल्या हालचालींना आमचा ठाम विरोध राहणार आहे. छत्रपती राजाराम महाराज, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांच्या मूळ तत्त्वाला हरताळ फासून न्यायालयाचा अवमानही केला जात असल्याचे पत्रकात म्हटले आहे. यामुळे या स्टुडिओची एक इंचभरही जागा आम्ही सोडणार नाही; त्यासाठी जनआंदोलन छेडण्याचा इशारा अध्यक्ष संजय पाटील यांनी दिला आहे. 

 

टॅग्स :Lata Mangeshkarलता मंगेशकरkolhapurकोल्हापूर