शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

तृप्ती देसार्इंना कोल्हापूर बंद करू

By admin | Updated: June 22, 2017 16:56 IST

महापालिका चौकात निषेधाच्या घोषणा

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. २२ : रस्ते हस्तांतरणाचा ठराव मंजूर केल्यास महापौर हसिना फरास यांच्या तोंडाला काळे फासणार, अशा प्रकारचे महापौरांबद्दल अनुद्गार काढणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना प्रसंगी ‘कोल्हापूर बंद’ केले जाईल, असा इशारा गुरुवारी महानगरपालिकेच्या विठ्ठल रामजी शिंदे चौकात झालेल्या आंदोलनावेळी देण्यात आला. महापौर फरास यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याच्या निषेधार्थ गुरुवारी कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघातर्फे विठ्ठल रामजी शिंदे चौकात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात काही राजकीय पक्ष, माजी महापौर, तसेच कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नगरसेवकांनीही भाग घेतला. सकाळी साडेअकरा वाजता निदर्शने सुरू झाली. ‘महापौरांचा अवमान करणाऱ्या तृप्ती देसार्इंचा धिक्कार असो,’ ‘तृप्ती देसाई कोण रे, पायताण मारा दोन रे’ अशा घोषणांनी चौक दणाणला. निदर्शनांनंतर चौकात निषेध सभाही झाली. यावेळी माजी महापौर महादेवराव आडगुळे यांनी महापौरांचा अवमान हा कोल्हापूर शहराचा अवमान आहे, असे सांगून महापालिकेच्या सभागृहात झालेल्या ठरावावर एवढी स्टंटबाजी करायची काही गरज नाही. जर त्यांना विरोध करायचाच असेल तर लोकशाही मार्गाने आंदोलन करावे किंवा न्यायालयात जाऊन दाद मागावी, असे त्यांनी आवाहन केले. महापौर फरास यांच्याबद्दलचे अनुद्गार मागे घ्यावेत अन्यथा आमच्या राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या महिला तृप्ती देसाई यांच्या केसांना कांदे बांधतील, असा इशारा माजी महापौर आर. के. पोवार यांनी दिला. महापालिकेतील ठराव मंजुरीची प्रक्रिया ही लोकशाही प्रक्रियेने झाली आहे. त्यात महापौरांचा दोष नाही. सभागृहाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महापौरांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा म्हणजे केवळ स्टंटबाजी आहे. ती खपवून घेणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष राजू लाटकर यांनी दिला. या आंदोलनात महापालिका मुख्य कार्यालयातील तसेच शिवाजी मार्केट कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी भाग घेतला. अधीक्षक पदाच्या वरील सर्व अधिकाऱ्यांनी यात भाग घेतला नाही. आंदोलनाचे नेतृत्व कर्मचारी संघाचे कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, बाबूराव ओतारी, दिनकर आवळे,अमित तिवले यांनी केले; तर उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार, गटनेते शारंगधर देशमुख, माजी नगरसेवक अशोक भंडारे, सुरेश जरग, किशोर घाडगे, बाबा पार्टे, अशोक पोवार यांनी त्यामध्ये भाग घेतला.

आयुक्त काय कारवाई करणार?

महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत राजकीय आंदोलन करू नये, असे आवाहन आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी बुधवारी (दि. २१) सायंकाळी केले होते. महापौरांबद्दल अनुद्गार काढल्याच्या प्रकाराचे आपण समर्थन करणार नाही; परंतु कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत आंदोलन करू नये, असे आवाहन त्यांनी केले होते. तरीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. याबाबत आता आयुक्त काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.