शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
3
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
4
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
5
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टी ७० अंकांच्या तेजीसह उघडला; मेटल-रियल्टी शेअर्समध्ये खरेदी
7
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
8
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
9
आधार कार्डापासून ते बॅंक अकाऊंट पर्यंत, १ नोव्हेंबरपासून बदलणार ‘हे’ ५ नियम; तुमच्या खिशावर थेट होणार परिणाम
10
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
11
आंतरराष्ट्रीय जुजित्सू खेळाडू रोहिणी कलम यांनी आयुष्य संपविले; एक फोन आला आणि ती खोलीत गेली...
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
13
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
14
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
15
टॅरिफची धमकी मिळाल्याने थायलंड-कंबोडियात युद्धबंदी; ट्रम्प यांच्या आणखी एका मध्यस्थीला मिळाले यश
16
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
17
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
18
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
19
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
20
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश

रक्ताचे नाही, पाण्याचे पाट वाहू द्या; सुळकूड पाणी योजनेवरुन प्रकाश आवाडेंचा मंत्री मुश्रीफांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 13:14 IST

लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणे ही दुकानदारी

इचलकरंजी : तुमच्याकडे कोण बघत नाहीत, ते बघावं म्हणून तुम्ही आंदोलन करता. शासनाने योजना मंजूर केली आहे, ती रद्द केली नाही. पाणी देतो म्हणून शासनाने मला विश्वास दिला आहे. मी सुळकूडचे पाणी आणणारच आहे. तरीही मग आंदोलनाची गरज का? मुद्दाम राजकारण सुरू आहे. त्यासाठी घोळका करून काहींनी दुकाने चालू केली आहेत, असा गंभीर आरोप आमदार प्रकाश आवाडे यांनी कोणाचेही नाव न घेता केला.येथील घोरपडे नाट्यगृह चौकात ‘इचलकरंजीचा पाणीप्रश्न आणि माझी भूमिका’ या विषयावर आयोजित निर्धार सभेत ते बोलत होते.आवाडे म्हणाले, पाण्यासाठी संघर्ष करण्याऐवजी विनंती करूया. तुम्ही आंदोलन केले, तर तेही आंदोलन करतील. तुम्ही शिव्या दिल्या, तर तेही देतील. यातून चर्चेनेच मार्ग काढणे योग्य ठरणार आहे. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. मी कागदपत्रे घेऊन पालकमंत्र्यांकडे समजून सांगण्यासाठी जातो. पाण्यासाठी काहीही करतो आणि हा प्रश्न सोडवतो. मात्र, काही मंडळी घोळका करून कायम विरोधात आहेत. हीच मंडळी कृष्णा योजनेवेळी विरोधात होती. ह्यो उलटी गंगा आणायला चाललायं, असे म्हणत होते. आजही तिच परिस्थिती आहे. आवाडेंच्या विरोधात बोलल्याशिवाय यांना जमत नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देऊया.सुरुवातीला आयजीएम, संजय गांधी निराधार योजना, कोरोना काळात केलेले काम याविषयी सविस्तर माहिती दिली. त्यानंतर वस्त्रोद्योगासाठी नक्कीच दिलासादायक काहीतरी करू, असे आश्वासन दिले. प्रकाश दत्तवाडे यांनी स्वागत व राहुल आवाडे यांनी प्रास्ताविक केले. उर्मिला गायकवाड यांनी आभार मानले.

लोकसभा लढवूताराराणी पक्ष कसा स्थापन झाला आणि त्याची जडणघडण याबाबत सविस्तर माहिती देऊन आमदार प्रकाश आवाडे यांनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूकही लढवू, अशी तयारी असल्याचे माजी जि. प. सदस्य राहुल आवाडे यांनी सभेमध्ये सांगितले.बॅलेट मशीन कमी पडेलसध्या गावात घोळका करून काहीजण एकत्र आले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यावर मी पुढं, काय तू पुढं म्हणून हे सगळे उभारतील. कारण खूपजणांना निवडणूक लढवायची आहे. कदाचित बॅलेट मशीनवर जागा कमी पडेल, असा टोला आवाडेंनी विरोधकांनी लगावला.पालकमंत्री पाण्याचे पाट वाहू द्यासण आहे, जरा सबुरीनं घ्या, असा सल्ला पालकमंत्री हसन मुश्रीफ देतात. मात्र, त्यांच्याकडून रक्ताचे पाट वाहण्याची भाषा येत होती. आमच्याकडून पाण्याचे पाट वाहू द्यात, अशीच भाषा येणार आणि आम्ही सुळकूडमधूनच पाणी आणणार.फायली का अडवतात?गावात पाणीसाठा करण्यासाठी सहा नवीन टाक्या शासनाच्या मागे लागून मंजूर करून आणल्या. त्याच्या फायली काहींनी मुंबईत अडविल्या. त्या फायली का अडवतात, हे आता सर्वांना माहीतच आहे, असे म्हणून टक्केवारीबाबत खोचक टीका केली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPrakash Awadeप्रकाश आवाडेHasan Mushrifहसन मुश्रीफ