शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना नागविणाऱ्या सरकारला नमवू

By admin | Updated: June 6, 2017 00:55 IST

संपतराव पवार : तहसील कार्यालयासमोर केली निदर्शने

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : आतापर्यंतच्या सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे, त्यामुळे कर्जमाफी देऊन कोण उपकार करत नाही. शेतकऱ्यांना नागविणाऱ्या सरकारला नमविल्याशिवाय आता थांबायचे नाही, असा इशारा माजी आमदार संपतराव पवार यांनी दिला. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवाजी पेठेतून दुचाकी व चारचाकी वाहनांची रॅली काढून करवीर तहसीलदार कार्यालयावर धडक दिली. तहसीलदार कार्यालयासमोर आल्यानंतर कार्यकर्त्यांनी ‘कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे’ आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी बोलताना संपतराव पवार यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली. सरकार गेंड्याच्या कातडीचे असून त्याला शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिसत नसल्याचे सांगत पवार म्हणाले, अल्प भूधारकांना कर्जमाफी देण्याचे गाजर दाखवून सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांना सर्वच राज्यकर्त्यांनी फसवले आहे, आता हे चालणार नसून आमची धूळफेक करणाऱ्यांना उधळून लावल्याशिवाय शेतकरी स्वस्थ बसणार नाही. गेली पाच दिवस शेतकऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे, पण सरकार असंवेदनशील असल्याने त्यांच्यावर काहीच फरक पडलेला नाही. येत्या चार दिवसांत सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला नाही तर यापेक्षाही उग्र आंदोलन केले जाईल. जमिनीत कसे पेरायचे आणि त्याची काढणी कशी करायची, याचे ज्ञान शेतकऱ्यांना चांगले आहे, त्यामुळे कोणी शेतकऱ्यांना भीती घालू नये; पण एक लक्षात ठेवा शेतकऱ्यांना नागवणाऱ्या सरकारला नमविल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा संपतराव पवार यांनी दिला. यावेळी मागणीचे निवेदन करवीरचे तहसीलदार उत्तम दिघे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी ‘भोगावती’ कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोक पवार, केरबा भाऊ पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब देवकर, बाजार समितीचे संचालक अमित कांबळे, बाबूराव कदम, पोपट ढवण, सरदार पाटील, डी. पी. कांबळे, तुकाराम खराडे, कुमार जाधव, संग्राम माने, मधुकर हरेल, सुशांत बोरगे, सुनीलकुमार सरनाईक, संभाजी जगदाळे आदी उपस्थित होते.शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करवीर तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी तहसीलदार उत्तम दिघे यांना मागण्यांचे निवेदन संपतराव पवार यांनी दिले.