शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

बिबट्यांची शिकार पैशांसाठी

By admin | Updated: October 26, 2014 23:26 IST

वनविभागाकडून होतेय दुर्लक्ष : सह्याद्री पट्ट्यात शिकारी वाढताहेत

अनंत जाधव - सावंतवाडी -सह्याद्रीच्या परिसरात वाढत्या बिबट्यांच्या शिकारप्रकरणी यापूर्वी आवाज उठवूनही वनविभागाने दखल घेतली नसल्याने बिबट्यांना मारून कातडी विकण्याचा नवा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणात सांगेलीतील पाचजण सहभागी असल्याने परिसरात मृत पावलेल्या बिबट्यांच्या मृत्यूची प्रकरणे बाहेर येण्यास मदत होणार आहे. याची केवळ येथील उपवनसंरक्षकांनी निपक्षपातीपणे चौकशी करणे गरजेचे असून संशयास्पदरित्या मृत झालेल्या बिबट्यांची फाईल बंद प्रकरणे बाहेर काढण्यात यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. कारण अनेक बिबट्यांचे मृत्यू हे पैशांच्या लोभापोटीच झाल्याचे दिसून येत आहेत. सांगेलीतील एका वाडीतून बिबट्याची शिकार करून त्याची कातडी विक्रीसाठी इस्लामपूर येथे नेत असताना गडहिंग्लज पोलिसांनी आठजणांना आंबोली- आजरा मार्गावरील आजरा तालुक्यातील गवसे येथे अटक केली होती. यात बहुतेक आरोपी सावंतवाडी तालुक्यातील सांगेली परिसरातील आहेत. यामध्ये अंजली नार्वेकर, नीलेश नार्वेकर, विशाल नार्वेकर, चंद्रकांत राऊळ  व सुदर्शन राऊळ आदींचा समावेश आहे. सांगेलीत बिबटा मारल्यानंतर त्याची कातडी इस्लामपूर येथील ग्राहाकाला विकायला नेत असताना हे बिंग फुटले. त्यामुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला. गेल्या काही वर्षात सह्याद्रीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यासह अन्य प्राण्यांच्या शिकारी झाल्या आहेत. यातील काही शिकारी उघडकीस आल्या आहेत. तर काही ठिकाणी प्राण्यांचे अवशेष जमा करण्यात वनविभागाने धन्यता मानली आहे.देवसू, दाणोली, केसरी, फणसवडे, सांगेली, कलंबिस्त या जंगलात मोठ्या प्रमाणात शिकारी केल्या जातात. अनेकवेळा याबाबत ग्रामस्थांकडून आवाजही उठविण्यात आला होता. पण त्याकडे वनविभागाने पुरते दुर्लक्ष केल्यामुळे शिकारीत वाढ झाली आहे. कलंबिस्तसह अन्य भागात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आहे. त्याकडेही प्रशासनाने दुर्लक्ष केले. तसेच वन्य प्राण्याच्या हत्त्येकडेही वनविभागाने दुर्लक्ष केल्याने आता बिबट्यांची शिकार झाल्याचे पुढे आले आहे.बिबट्यांच्या मृत्यूची फाईल बंद प्रकरणे शोधणे गरजेचेसह्याद्रीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्यांचे मृत्यू झाले आहेत. यातील अनेक बिबट्यांच्या मृत्यूमागे संशयाला वाव आहे. बिबट्यांचे मृत्यू हे शिकारीच्या उद्देशानेच झाल्याचे दिसून आले. मात्र, त्यानंतरही अन्य काहीच माहिती मिळत नसल्याने वनविभागाने अनेक प्रकरणे फाईल बंद केली आहेत. अशा बिबट्यांच्या संशयास्पद मृत्यूंच्या फाईल पुन्हा रिओपन केल्यास अनेक शिकारी हाती लागू शकतात. सांगेलीतील बिबट्याच्या शिकारीच्या प्रकरणाचा धागा पकडून अनेक प्रकरणांची चिरफाड केली जाऊ शकते आणि सत्य बाहेर येऊ शकते.वाघानंतर बिबट्याच्या कातडीला महत्त्वयापूर्वी अनेकवेळा वाघाच्या कातडीची चोरटी वाहतूक करताना संशयितांना पकडण्यात येत होते. पण अनेक शिकारी वाघाच्या नावाखाली बिबट्याची कातडी खपवतात. ज्यांना हा सौदा कळतो, तो गप्प राहतो अन्यथा काहीजण फसवणुकीच्या नावाखाली याची माहिती अन्यत्र पुरवतात. तसाच काहीसा सांगेलीतील प्रकार असल्याचे बोलले जात आहे. बाजारात वाघाच्या कातडीला मोठे महत्त्व आहे. साधारणत: पाच लाखांपर्यंत ही कातडी विकली जाते. तर बिबट्याची कातडी ही जास्तीत जास्त तीन लाखांपर्यत विकली जाते.सांगेली कनेक्शनची चौकशी होणार : सहाय्यक उपवनसंरक्षककातडे सापडलेल्या बिबट्याची सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठेही हत्या झाली असेल तर चौकशी केली जाणार. ही चौकशी आम्ही आमच्या विभागामार्फत करणार असल्याचे मत फिरत्या पथकाचे प्रमुख प्रकाश बागेवाडी यांनी व्यक्त केले आहे.