शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
5
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
6
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
7
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
8
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
9
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
10
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
11
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
12
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
13
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
14
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
15
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

यंत्रमागाच्या अनुदानासाठी आमदारांची कसोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 23:19 IST

वस्त्रोद्योगमंत्र्यांचे आश्वासन : वीज दर सवलत व व्याजाच्या अनुदानाकडे वस्त्रनगरीतील यंत्रमागधारकांचे लक्ष

राजाराम पाटील - इचलकरंजी --आर्थिक मंदीमध्ये भरडल्या जाणाऱ्या यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था यावी म्हणून वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी या उद्योगासाठी एक रुपया प्रतियुनिट वीज सवलत व कर्जावर पाच टक्के व्याज दराचे अनुदान असा उपाय शासन ताबडतोब अमलात आणेल, अशी ग्वाही येथील वस्त्रोद्योग परिषदेत दिली. आमदार सुरेश हाळवणकर यांनी विशेष प्रयत्न करून ‘मंत्री आपल्या दारी’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली. आता मंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाठपुरावा करून त्याचा फायदा प्रत्यक्ष यंत्रमागधारकांना मिळवून देण्यामध्ये आमदारांची कसोटी लागणार आहे.वस्त्रोद्योगाला गेले वर्षभर आर्थिक मंदीने सतावले आहे. देशातील एकूण यंत्रमागांपैकी निम्म्याहून अधिक तेरा लाख यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे राज्यात शेतीनंतर मोठा रोजगार पुरविणारा वस्त्रोद्योग-यंत्रमाग उद्योग आहे. कापूस - सूतगिरण्या - यंत्रमाग - प्रोसेसिंग - गारमेंट अशी परिपूर्ण साखळी वस्त्रोद्योगात आहे. अशा वस्त्रोद्योगात राज्यात एक कोटी जनता प्रत्यक्ष काम करीत आहे. त्यामुळे राज्य शासनाने या उद्योगावर पूर्वीप्रमाणेच विशेष लक्ष दिले पाहिजे.यंत्रमाग उद्योगातील सातत्याच्या मंदीमुळे कर्जबाजारी झालेल्या दत्ता धंदले या यंत्रमागधारकाने २६ जूनला आत्महत्या केल्याने वस्त्रनगरीमध्ये खळबळ उडाली. ‘लढा जगण्याचा’ या बॅनरखाली यंत्रमागधारकांनी पाच दिवस धरणे आंदोलन केले. आमदार सुरेश हाळवणकर यांनी हा प्रश्न पावसाळी अधिवेशनात, तर खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभेमध्ये उपस्थित केला. त्यानंतर यंत्रमागधारकांच्या चारही संघटनांनी यंत्रमाग उद्योगात आलेल्या अभूतपूर्व मंदीवर उपाय सूचविण्यासाठी खासदार शेट्टी, आमदार हाळवणकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार निवेदिता माने, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, यंत्रमाग महामंडळाचे अध्यक्ष हिंदुराव शेळके, वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, आदींची बैठक ६ आॅगस्टला रोटरी क्लबमध्ये झाली. यंत्रमागाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी स्थापन केलेल्या कृती समितीचे निमंत्रक खासदार शेट्टी व सहनिमंत्रक आमदार हाळवणकर झाले. खासदार शेट्टींनी यंत्रमागाच्या विविध समस्यांबाबत विचारविनिमय करणारी एक बैठक केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे २२ आॅगस्ट रोजी लावली. तर त्यापाठोपाठच आमदार हाळवणकर यांनी २७ आॅगस्टला वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांना थेट इचलकरंजीत आणले. अशाप्रकारे यंत्रमाग उद्योगाला ऊर्जितावस्था आणण्यासाठी सुरू झालेल्या प्रयत्नांना गती आली आहे. यापूर्वी आमदार हाळवणकर यांनी यंत्रमाग क्षेत्रासाठी सवलतीचा वीज दर असावा, याकरीता शासनाकडे जोरदार प्रयत्न केले. त्याचे फलित म्हणून यंत्रमागाला वीज दर फरकात स्वतंत्र वर्गवारी मिळाली आणि २ रुपये ६६ पैसे या दराने वीज उपलब्ध करून देण्याचे शासनाने मान्य केले. आता वस्त्रोद्योगमंत्र्यांनी या वीज दरामध्ये आणखीन एक रुपयांची सवलत देण्याबरोबरच यंत्रमागधारकांनी घेतलेल्या कर्जावर पाच टक्के व्याज अनुदान देण्यात येईल, असे वस्त्रोद्योग परिषदेमध्ये जाहीर केले आहे. हे अनुदान १ जुलैपासून देण्यात येणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. त्यामुळे आमदार हाळवणकर यांच्या जबाबदारीमध्ये मोठी वाढ झाली असून, वस्त्रोद्योग मंत्र्यांची घोषणा लवकरात लवकर यंत्रमागधारकांच्या पदरात पाडून देण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. थेट लाभ यंत्रमागधारकांना मिळावा : महाजनशासनाने दिलेल्या सवलतींचा लाभ छोट्या यंत्रमागधारकांना मिळण्यासाठी वीज दर किंवा अन्य प्रकारच्या अनुदानाचा थेट लाभ होण्यासाठी यंत्रमागधारकांच्या बॅँक खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात यावी; अन्यथा त्याचा लाभ परस्परपणे व्यापाऱ्यांकडून लाटला जातो. याचाही पाठपुरावा शासनाकडे झाला पाहिजे, अशी अपेक्षा यंत्रमागधारक कृती समितीचे विनय महाजन यांनी व्यक्त केली.