शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोधामागे विधान परिषदेची तयारी

By admin | Updated: August 4, 2015 23:56 IST

वडगाव बाजार समिती : आगामी निवडणुकीसाठी महादेवराव महाडिक यांची खेळी

आयुब मुल्ला-खोची -वडगाव शेती उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करण्यात आमदार महादेवराव महाडिक यांना यश आले. यासाठी सर्व गटांना बरोबर घेताना बरीच कसरत करावी लागली. स्वत:च्या गटाला अपेक्षेपेक्षा कमी जागा घेत बिनविरोधाचा खेळ यशस्वी करण्यामागे विधान परिषदेचे गणित असून, त्यांनी सहकाऱ्यांसह सर्वांनाच खूश केले. माजी खासदार निवेदिता माने यांच्या गटाला हक्काची एक जागा मिळाली नाही. त्यामुळे माने गट व शिवसेना यांना संचालकपदाची संधी मिळाली नाही.या समितीची वर्षाला सुमारे तीन कोटी रुपयांची उलाढाल आहे. या समितीवर बरीच वर्षे स्वर्गीय आमदार रत्नाप्पाण्णा कुंभार व शामराव पाटील-यड्रावकर गटाची सत्ता होती. त्यानंतर महाडिक यांचेच वर्चस्व राहिले आहे. इतर गटांपेक्षा आवाडे यांच्या गटाला जास्त जागा देत त्यांनी आपले वर्चस्व कायम ठेवले. यावर्षी मात्र सर्वच गटांनी अर्ज दाखल केले. तत्पूर्वी महाडिक यांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाडे गटाला सहा, जनसुराज्यला दोन, तर माने गटाला एक व उर्वरित दहा जागा आपल्या गटाला देण्याचे सूत्र ठरविले होते.मात्र, हे सूत्र टिकले नाही. यात बदल करण्याची वेळ त्यांच्यावर आली. शरद सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर, भाजप तसेच शिवसेना आपल्याला विचारातच घेत नाहीत. यामुळे कार्यकर्त्यांना अर्ज दाखल करावयास लावले. अंतिम टप्प्यात माजी खासदार जयवंतराव आवळे यांनीही तोच निर्णय घेतला. त्यामुळे अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या शतकाच्यावर गेली.यामुळे महाडिक यांची अडचण झाली. इतरांसाठी स्वत:च्याच जागा कमी करणे हाच पर्याय त्यांच्यासमोर राहिला. त्यांनीही मनाचा मोठेपणा दाखवित यड्रावकर, आवळे, भाजप यांना प्रत्येकी एक जागा दिली. माने गटाला मात्र शेवटच्या टप्प्यात डच्चू दिला. जे दोन संचालक महाडिक यांना मानतात ते माने यांनाही मानतात. त्या दोघांना माने गटाचे समजा असाच अप्रत्यक्ष सल्ला राजकारणात दिला. परंतु, त्यामुळे त्यांना दोन्ही गटांचे समजा असेच चित्र निर्माण झाले.आठ जागा घेण्याचेही राजकारणमहाडिक यांच्या कार्यकर्त्यांना आठ जागांवर समाधान मानावे लागले. तालुक्याच्या पश्चिम भागात असणारी ही समिती इथल्या कार्यकर्त्यांपेक्षा उत्तरेला जास्त संधी देणारी ठरली आहे. बिनविरोध निवडीमागे विधान परिषदेचे गणित सोपे व्हावे, असा उद्देश असल्याचेही बोलले जाते.