शहरं
Join us  
Trending Stories
1
'महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतोय, तुम्हाला आपटून आपटून मारू?', भाजप खासदार निशिकांत दुबेंचा ठाकरेंवर हल्ला
2
"पैसे देणे होत नसेल, तर पत्नी माझ्या घरी आणून सोड"; व्याजाच्या पैशावरून त्रासाने संपवलं जीवन
3
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
4
"हो मी पाकिस्तानी सैन्याचा एजंट होतो", तहव्वूर राणाने चौकशीमध्ये केले अनेक धक्कादायक गौप्यस्फोट
5
Crizac IPO Allotment Status: ६० पट सबस्क्रिप्शन, शेअर्स अलॉट झालेत का, कसं कराल चेक? GMP प्रीमिअमवर
6
फुलेरात पुन्हा येण्याची तयारी सुरु करा! 'पंचायत ५'ची अधिकृत घोषणा, 'या' दिवशी रिलीज होणार
7
खळबळजनक! दिवसाढवळ्या एका व्यावसायिकाची गोळ्या घालून हत्या
8
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
9
किती वाईट दिसतंय ते? अंकिता लोखंडेचा लूक पाहून चाहते शॉक; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
10
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
11
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
12
चातुर्मासातील पहिले भौम प्रदोष व्रत: ‘असे’ करा पूजन, महादेवांची अखंड कृपा; शुभच होईल!
13
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
14
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
15
Chaturmas 2025 Rangoli: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
16
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
17
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
18
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
19
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
20
कर्नाटकातील अथणीत कार-बसचा अपघात, चौघे ठार; कोल्हापूरहून देवदर्शन करून परतताना काळाचा घाला

डाव्यांचं उजवंपण...

By admin | Updated: August 12, 2014 23:13 IST

डावखुऱ्यांची दुनिया न्यारी : अनेकदा येतात अडचणी तरीही त्यावर करतात मात

सातारा : असे म्हटले जाते की डावखुरेपण हे गुणसुत्रांवर अवलंबून असते. कदाचीत हे खरे असेल ही. जगातील बहुतांश लोक दैनदिन व्यवहार असोत अथवा शुभ कार्य असो उजव्या हातानेच करीत असतात. परंतू काही अशाही व्यक्ती आहेत जी आपली सर्व कामे डाव्या हाताने करतात. असे का होते हे मात्र कोणीच सांगू शकत नाही. असे असले तरी डावखुऱ्या व्यक्तिंनी उजव्या व्यक्तिंप्रमाणे सर्व कामे करून आपलं उजवपणं सिद्ध करुन दाखवलंय.मनुष्य डावखुरा आहे की उजवा हे त्या व्यक्तिने एखादी कृती केल्याशिवाय समजूच शकत नाही. उजव्या व्यक्तिंपेक्षा डावखुऱ्या व्यक्तिंची संख्या अत्यल्प असली तरी डावखुऱ्या व्यक्ती कल्पक आणि हुशार असतात.डाव्या हाताने काम करणाऱ्या मुलांना मोठ्यांकडून टोकले जाते. कारण आपण उजव्या हाताला परंपरेने शुभ मानत आलो आहोत. दान, धर्म एवढेत काय आशिर्वाद देण्यासाठीही उजव्या हाताचाच वापर केला जातो. या परंपरेचा डावखुऱ्या व्यक्तिंवर काही अंशी परिणाम होताना दिसतो. उजव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तिंप्रमाणेच डावखुऱ्या लोकांचे वर्तन असते. लिखान काम करताना मात्र डावखुऱ्या मुलांची तारांबळ होताना दिसते. त्यामुळे डावखुऱ्या व्यक्तिंना वापरास सोयीचे होईल अशी काही उपकरणे मुद्दाम विकसीत केली जातात.एखादी मुलगी जर डावखुरी असेल तर तीला आपल्या सासरी याचा त्रास जाणवतो. डाव्या हाताने काम करण्याची सवय असल्याने तिला वारंवार उजव्या हाताने काम करण्याची सक्ती केली जाते. मात्र तीच्या अडचणी समजूण घेतल्या जात नाहीत. उजव्या हाताने काम करणाऱ्या व्यक्तिंनी किमान एक तास सर्व कामे डाव्या हाताने करून पहावीत, मगच त्यांना डावखुऱ्या लोकांच्या अडचणी समजू शकतील.असे असले तरी या विश्वास अशा कितीतरी डावखुऱ्या व्यक्ती आहेत ज्यांनी आपलं उजवपणं सिद्ध करून दाखवल आहे. (प्रतिनिधी)बहुतेक जण म्हणतात उजवा शुभ असतो. परंतू मी सर्व शुभ आणि धार्मिक कामे डाव्या हातानेच करतो. डाव्या हाताच्या वापराने लिखान काम वेगाने होते. ‘लेफ्ट ईज राईट’ हे सुत्र मी आता अंगिकारले आहे. मला उजव्या हाताने मात्र कोणतेही जड काम होत नाही.- दतात्रय राठोड (विद्यार्थी)मला डावखुरे असण्याची कोणतीच अडचण येत नाही, उलट डावखुरे असल्याचा अभिमान वाटतो; कारण उजव्या लोकांसारखी आमची कामेही सामान्य आहेत. अक्षर, चित्रकला चांगली आहे. असे असूनही काही लोकं डावखुऱ्यांना कमी लेखतात. विशेषता: मुलींना आणि स्त्रियांना उजव्या हाताने काम करणे भाग पडतात.- अस्मिता पाटील (विद्यार्थी)मी डावखुरी आहे. लेखन वगळता इतर कामे उजव्या हातानेच करते. मी जर डाव्या हाताने स्वयंकाप केला तर घरातील व्यक्ती रागवतात. डावखुरे असल्याने काही लोकांना याचे अप्रुप वाटते. डावखुऱ्या लोकांबाबत असलेले समज-गैरसमज दूर करण्यासाठी प्रबोधन होने गरजेचे आहे.- गौरी डाके (विद्यार्थी)शाळेत असताना एकाच बेंचवर बसलं की मी डाव्या हाताने लिहायचो आणि शेजारचा उजव्या हाताने. आमच्या दोघांचे हात त्यामुळे सारखे धडकायचे. अनेकदा धार्मिक कार्यक्रमाला गेल्यावर मात्र अडचण होते. सवयीप्रमाणे मी डावा हात पुढे करतो आणि आपल्याकडे प्रसादासाठी उजवा हाताचा वापर होतो. माझं डावखुरे असणं ही माझ्यासाठी खासियतच आहे.विक्रांत पाटील (नोकरदार)डावखुरेदिनविशेष...