शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग वीज, व्याज दर सवलत प्रस्ताव टप्प्यात

By admin | Updated: September 28, 2016 00:43 IST

वस्त्रोद्योग महासंघाच्या बैठकीत निर्णय : सूतगिरण्यांना बिनव्याजी अर्थसाहाय्य; १५७ कोटींची तरतूद

राजाराम पाटील==इचलकरंजी -राज्यातील यंत्रमागांसाठी प्रतियुनिट एक रुपये सवलतीकरिता २१३ कोटी रुपयांची तरतूद आणि यंत्रमागधारकांनी घेतलेल्या कर्जासाठी पाच टक्के व्याज दराची सवलत, तसेच सूतगिरण्यांना प्रती चाते (स्पिंडल) तीन हजार रुपये बिनाव्याज अर्थसाहाय्य देण्यासाठी १५७ कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव शासन तयार करीत आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाच्या व्यापक बैठकीत वस्त्रोद्योग उपसचिव बी. बी. चव्हाण यांनी दिली.राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या मुंबई येथील सभागृहात राज्यातील सहकारी सूतगिरण्यांचे पदाधिकारी व कार्यकारी संचालकांची बैठक महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सहकारी क्षेत्रातील सूतगिरण्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्यावरील व्याज शासन भरणार असून, या मुदलाच्या रकमेची परतफेड गिरण्यांनी करावयाची आहे. तसेच सूतगिरण्यांना किफायतशीर भावात कापसाचा पुरवठा करण्यासाठी कापूस महासंघाने सहा लाख कापूस गाठी खरेदी करावा. यासाठी ४१९ कोटी रुपयांची तरतूद करण्याचाही निर्णय घेण्यात आल्याची माहिती महासंघाचे अध्यक्ष स्वामी यांनी या प्रतिनिधीला दिली.देशातील यंत्रमागांपैकी निम्म्याहून अधिक १३ लाख यंत्रमाग महाराष्ट्रात आहेत. सध्या असलेल्या अभूतपूर्व मंदीमुळे सहकारी सूतगिरण्या व यंत्रमाग उद्योग नुकसानीत आहे. नुकसान कमी करण्यासाठी दोन्ही उद्योगांना उत्पादनात घट करावी लागत आहे. दोन-तीन महिन्यांत राज्यातील एक कोटी जनतेला रोजगार देणाऱ्या वस्त्रोद्योगामध्ये तो कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार सुरेश हाळवणकर यांच्या नेतृत्वाखाली यंत्रमाग केंद्रांमधील विधानसभा सदस्यांनी मुख्यमंत्री व वस्त्रोद्योग मंत्री यांची भेट घेऊन वस्त्रोद्योग वाचविण्याचे साकडे घातले. तसा आवश्यक प्रस्ताव आमदार हाळवणकर यांनी सादर केला आहे. दोन-तीन आठवड्यांत या पॅकेजची घोषणा होण्याची अपेक्षा आहे, असेही स्वामी यांनी स्पष्ट केले. या बैठकीस माजी मंत्री रमेश बंग, माजी आमदार विश्वनाथ चकोते, दीपकभाई पाटील, अनिल कवाळे, राहुल आवाडे, प्रा. किसनराव कुऱ्हाडे, विश्वनाथ मेटे, चंद्रकांत देशमुख, आदी प्रमुख उपस्थित होते.मंत्री सकारात्मक : माहिती संकलन पूर्णइचलकरंजीमध्ये २७ आॅगस्टला झालेल्या वस्त्रोद्योग परिषदेमध्ये वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी, यंत्रमाग उद्योगाला विजेसाठी एक रुपया आणखीन अनुदान व कर्जावर पाच टक्के व्याज दराची सवलत देण्याची घोषणा केली होती. मंत्रीच सकारात्मक असल्यामुळे त्याप्रमाणे राज्यात असलेल्या वस्त्रोद्योगाच्या मुंबई, सोलापूर, औरंगाबाद व नागपूर येथील प्रादेशिक उपसंचालक कार्यालयांकडून वस्त्रोद्योगातील घटक उद्योगामध्ये सध्याच्या मंदीच्या झालेल्या परिणामांची आणि कर्जांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर झाले आहे.